Monday Astrological Remedies saam tv
लाईफस्टाईल

Somvar Upay: घरी येईल अचानक भरपूर पैसा; सोमवारच्या दिवशी शंकरासाठी करा हे खास उपाय

Somvar che Upay: हिंदू धर्मात सोमवार हा महादेवाला म्हणजेच शंकराला समर्पित दिवस मानला जातो. या दिवशी शेकडो भाविक शिव मंदिरातील शिवलिंगावर जल अर्पण करतात. अशा परिस्थितीत या दिवशी काही उपाय तुम्ही करू शकता.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा एका खास देवाला समर्पित केलेला असतो. अशा खास दिवशी त्या देवाची पुजा करणं शुभं मानलं जातं. आज सोमवार असून सोमवारचा दिवस हा भगवान शिव यांना समर्पित केलेला आहे. शिव यांना प्रेम आणि शक्तीचा देवता मानलं जातं.

हिंदू शास्त्रानुसार, असं मानलं जातं की जर कोणी भगवान शिव यांची भक्तीभावाने पूजा केली तर त्याच्या जीवनात आनंद येतो आणि मृत्यूनंतर त्याला मोक्ष देखील प्राप्त होतो. असं म्हटलं जातं की, सोमवारी भगवान शिव यांना पाण्याचे भांडे अर्पण केले तरी ते प्रसन्न होतात आणि भक्ताला इच्छित फळ देतात. याशिवाय सोमवारच्या दिवशी तुम्ही कोणते उपाय करू शकता ते पाहूयात.

सोमवारच्या दिवशी करा हे उपाय

पाणी-दूध अर्पण करा

सोमवारच्या दिवशी शंकर देवाच्या मंदिरात जा. त्या ठिकाणी असलेल्या शिवलिंगावर पाणी, दूध आणि गंगाजल चढवा. यामुळे भगवान प्रसन्न होऊ शकतात. यामुळे सुख आणि समृद्धीही मिळू शकते.

बेलपत्र आणि धोत्राचं फूल

शिवलिंगावर बेलपत्र, धोत्र्याचं फूल अर्पण केल्याने भक्ताला जीवनात सुख आणि सौभाग्य मिळते. त्यामुळे तुम्ही हा उपाय देखील करू शकता.

या मंत्राचा जप करा

सोमवारी, शिवलिंगाची योग्य पूजा केल्यानंतर महामृत्युंजयचा जप करा. या मंत्राचा जप केल्याने साधकाला आजार आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्तता मिळण्यास मदत होते.

काय दान केलं पाहिजे?

सोमवारी शिव मंदिरात रुद्राक्ष दान करा. यामुळे साधकाला शुभ फळं मिळतील.

सोमवारी कोणत्या रंगाचे कपडे घाला

याशिवाय साधकाने सोमवारी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. यामुळे तुमच्या मनात शांती आणि सकारात्मक ऊर्जा येईल. साधकाने या दिवशी उपवास देखील करावा. यामुळे शरीर आणि मनाला शुद्धतेची भावना येतं.

नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी

जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्या नोकरीत काही अडचणी येत असतील तर सोमवारी शिवलिंगावर मध अर्पण करा. यामुळे तुमच्या कारकिर्दीत प्रगतीची नवीन दारं उघडतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT