Panic Attack  Saam Tv
लाईफस्टाईल

Panic Attack : एखाद्या गोष्टीची सतत भीती वाटू लागली की तुम्ही पॅनिक अटॅकचे शिकार होऊ शकता, जाणुन घ्या लक्षणे आणि कारणे

खराब जीवनशैलीमुळे लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Health Tips : खराब जीवनशैलीमुळे लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. बाहेरचे काम आणि इतर समस्यांमुळे माणसाची मानसीक स्थिती गंभीर होत जाते. लगातार वाढणाऱ्या या समस्यांमुळे माणसाला पॅनिक अटॅक अशा प्रकारच्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते.

अशातच जगातील प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता मानसीक (Mental Health) आजार जडलेला असतो. पण त्यामधून सावरणे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वताला कमजोर न समजून समजून घेणे हे अतिशय महत्वाचे असते. नाहीतर बरेच लोकं पॅनिक अटॅक अशा अनेक प्रकारच्या ह्रदय रोगांना बळी पडतात.

पॅनिक अटॅक (Attack) म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर कोणी सांगितले असेल की तू आता मरणार आहेस आणि त्या व्यक्तीला अशा पद्धतीची भीती वाटत असेल की आता आपल काही खर नाही आपण आता मरणार आहोत हे खरोखरच त्यांना वाटू लागत.

किंवा एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला हार्ट अटॅक येईल असं त्या व्यक्तींना वाटत असत. बरेच लोक पॅनिक अटॅकमुळे आपला जीव गमावून बसतात. एखाद्या व्यक्तीला पॅनिक अटॅक आल्यावर तूम्ही त्वरीत त्यांची मदत कशी करू शकता. हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पॅनिक अटॅक हा एक असा आजार आहे जो कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही वेळी येऊ शकतो. या समस्येमध्ये व्यक्तीच्या हृदयाची धडधड जास्त प्रमाणात वाढू लागते.

त्याचबरोबर घाम येणे , श्वास घ्यायला त्रास होणे , पोटामध्ये जकडणे , चक्कर येणे , आतल्या आत गुदमरणे अशी लक्षणें दिसुन येतात. जर एखाद्या व्यक्तीला पॅनिक अटॅक आला तर त्याला लगेचच डॉक्टरकडे घेऊन जायला हवे.

पॅनिक अटॅकचे कारण -

बऱ्याचदा आपल्याला होणाऱ्या समस्या या आपल्या जीवनातील बदलत्या हालचाली, बदलते खानपान यांवरून होतात. पॅनिक अटॅक याच स्मायांपैकी एक आहे. या समस्यांची काही कारणे नॉर्मल तर काही करणे गंभीर देखील असू शकतात.

पॅनिक अटॅकची ठोस करणे -

1. कोणत्याही गोष्टीचा मानसीक तणाव असते.

2. कोणत्याही कारणावरून भिती वाटणे.

3. दारू किँवा ड्रग्जचं अत्याधिक सेवन.

4. गोळ्या औषधांचे सेवन.

5. भूतकाळात घडून गेलेली कोणतीही दुःखद आणि अविस्मरणीय घटना.

6. मेंदु संबधी कोणतीही समस्या किंवा ट्रॉमा होणे.

या टीप्स वापरून तुम्ही पॅनिक अटॅक आलेल्या रोग्याची मदत करू शकता.

1. त्यांना पाणी प्यायला द्या -

ज्या व्यक्तीला पॅनिक अटॅक आला असेल त्याला लगेच पाणी प्यायला द्यावे. पाणी हे आपल्याला शांत ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर पॅनिक अटॅक आलेल्या व्यक्तीला थंड पाणी प्यायला दिल्यावर तो व्यक्ती शांत राहण्यासाठी पॅरासिंपेथेटीक नर्वस सिस्टम सक्रिय होते.

यामुळे व्यक्तीला अटॅक आल्यावर शांत राहण्यास मदत मिळते. म्हणूनच पॅनिक अटॅक आल्यावर थंड पाणी हे उपयुक्त ठरते. त्याचबरोबर अटॅकमधून बाहेर येण्यासाठी तुम्ही त्यांच्या तोंडावर, हातापायांवर थंड पाणी टाकू शकता.

2. पिडीत व्यक्तीसोबत बोला -

पॅनिक अटॅक आलेल्या व्यक्तींसोबत व्यवस्थीत बोला. त्यांना नेमके काय झाले आहे हे विचार. त्याचबरोबर त्यांना एका चांगल्या जागेवर बसवून त्यांच्याशी बोलून त्यांना समजून घ्या. तेवढंच त्या व्यक्तीला पॅनिक अटॅक पासून थोड बरं वाटेल.

3. ग्राऊंडिंग टेक्निकचा वापर करा -

पॅनिक अटॅक आल्यावर व्यक्तीला शांत करण्यासाठी पाच इंद्रिये मदत करू शकतात. यामध्ये तुम्ही ग्राऊंडींग टेक्निकची मदत घेऊ शकता. 5-4-3-2-1 ही एक सामान्य ग्राऊंडींग टेक्निक आहे.

ज्यामधे तुम्ही त्या व्यक्तीला कोणत्याही 5 गोष्टी करण्यासाठी सूचीबद्ध करू शकता. तुम्ही त्यांना पाच अशा गोष्टींबद्दल विचारा ज्यांना ते पाहू शकतात. चार अशा गोष्टींबद्दल प्रश्न विचारा ज्यांना ते स्पर्श करू शकतात.

तीन अशा गोष्टींबद्दल विचारा ज्यांना ते एकु शकतात. दोन अशा गोष्टींबद्दल विचारा ज्यांचा ते सुगंध घेऊ शकतात. एका अशा गोष्टींबद्दल विचारा ज्यांची ते चव ओळखू शकतात. या टेक्निकमुळे त्या व्यक्तीचे मन तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात रमेल आणि त्यांना पॅनिक अटॅकमधुन बाहेर येण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT