Clock Vastu Shastra saam tv
लाईफस्टाईल

Clock Vastu Shastra: चुकीच्या दिशेला लावलेलं घड्याळ आयुष्यात आणेल वाईट वेळ; कंगाल होण्यापूर्वी जाणून घ्या वास्तू टीप्स

Clock Vastu Shastra: वास्तू शास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीबाबत काही खास नियम देण्यात आले आहे. या नियमांनुसार, या गोष्टी घरात ठेवल्या गेल्या पाहिजेत. आज आम्ही तुम्हाला घड्याळाशी संबंधित काही वास्तू नियमांबद्दल सांगणार आहोत.

Surabhi Jayashree Jagdish

घरात सुख आणि शांती यावी असं सर्वांना वाटतं. यासाठी आपण ज्योतिष्य शास्त्राची मदत घेतो. घरात सर्व गोष्टी चांगल्या व्हाव्यात यासाठी वास्तू शास्त्राच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. वास्तू शास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीबाबत काही खास नियम देण्यात आले आहे. या नियमांनुसार, या गोष्टी घरात ठेवल्या गेल्या पाहिजेत.

वास्तू शास्त्रामध्ये, आपल्या घरात लावण्यात येणाऱ्या घड्याळाबाबत देखील अनेक नियम सांगण्यात आले आहेत. जर घड्याळ योग्य ठिकाणी ठेवलं नाही तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो, असं मानलं जातं. आज आम्ही तुम्हाला घड्याळाशी संबंधित काही वास्तू नियमांबद्दल सांगणार आहोत.

कोणत्या दिशेला लावलं पाहिजे घड्याळ?

वास्तु शास्त्रानुसार, घरातील घड्याळ उत्तर, पूर्व आणि पश्चिम दिशेला असलं पाहिजे. कधी चुकूनही घड्याळ दक्षिण दिशेला ठेवू नये. घड्याळ या दिशेला ठेवल्याने आर्थिक हानी होत असल्याचं मानलं जातं.

बंद घड्याळ घरी ठेऊ नये

जर घड्याळ बंद झालं असेल किंवा खराब झालं तर असं घड्याळ घरी ठेऊ नये. याशिवाय तुटलेलं घड्याळ देखील घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. बंद किंवा खराब झालेलं घड्याळ घरी ठेवल्याने तुमच्या आयुष्याने अनेक समस्या येऊ शकतात, असं मानलं जातं.

'या' जागी घड्याळ लावू नये

वास्तुशास्त्रानुसार, ज्या ठिकाणी घराचं प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी घड्याळ लावू नये. तसंच प्रवेशद्वाराच्या वरील बाजूला घड्याळ लावणं योग्य नाही. यामुळे तुमच्या जीवनात कठीण प्रसंग येण्याचा धोका असतो.

घरामध्ये कोणत्या रंगाचं घड्याळ लावणं मानलं जातं शुभं?

वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये पांढरं, निळं, हिरव या रंगांचं घड्याळ तुम्ही लावू शकता. हे घड्याळ लावल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारू शकते. त्याचप्रमाणे वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये गोल आकाराचं घड्याळ लावणं शुभ असतं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT