कोणत्याही आजाराचं निदान करायचं असेल तर त्याची लक्षणं समजून घेतली पाहिजे. असंच नव्या केलेल्या एका संशोधनाने असे संकेत दिल आहेत की, आपल्या रक्तात असलेले काही प्रोटीन हे भविष्यात गंभीर आजारांचे आणि मृत्यचे संकेत देतात.
सरे युनिवर्सिटीच्या सगळ्या संशोधकांकडून केलेल्या या अभ्यासात युकेच्या बायोबँकेच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये ३९ ते ७० वर्षांच्या ३८ हजारांपेक्षा अधिक लोकांचे ब्लड सँपल आणि आरोग्याची माहिती घेण्यात आली.
या अभ्यासादरम्यान संशोधकांनी प्रत्येक ब्लड सँपलमध्ये असलेल्या जवळपास ३००० प्रोटीनची तपासणी केली. यावेळी त्यांनी हे पाहलं की कोणत्या प्रोटीनचा स्तर ५ ते १० वर्षांच्या आत नॉन एक्सीडेंटल मृत्युशी जोडला होता.
या रिपोर्टनुसार, पूर्ण रिसर्चच्या दरम्यान वय, बीएमआय आणि स्मोकिंगसारख्या धोकादायक घटकांचा विचार केला गेला. यानंतर असे शेकडो प्रोटीन सापडेल ज्यांचा संबंध कॅन्सर, हृदयरोग आणि इतर आजारांशी होता, ज्यामुळे मृत्यू होण्याचा धोका होता. ही सर्वात धोकादायक बाब होती.
संशोधकांनी या रिसर्चच्या आधारे काही छोट्या प्रोटीनचं पॅनल तयार केलं. ज्यामधील एका पॅनलमघ्ये १० प्रोटीनचा समावेश होता, ज्याचा १० वर्षांच्या आता मृत्यू होण्याशी संबंध होता. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रक्तात असलेले काही प्रोटीन शरीराच्या आत धीम्या गतीने सुरु असलेल्या बायोलॉजिकल प्रोसेस जसं की, सूज, अवयवांवर ताण आणि इम्युन सिस्टीमच्या समस्यांची माहिती देतं. ज्यांची लक्षणं ही दिसून आलेली नसतात.
संशोधकांनी हे स्पष्ट केलंय की, ही टेस्ट कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूची वेळ ठरवत नाही. याला आपण एक अर्ली वॉर्निंग सिस्टीमच्या रूपाने पाहिलं पाहिजे. ज्यामुळे आपण वेळीच तपासणी आणि आजाराला रोखू शकतो. आरोग्य तज्ज्ञांनुसार, जर पुढच्या काही अभ्यासांमध्ये याबाबत पुरेसे पुरावे सापडले तर भविष्यात अशी ब्लड टेस्ट फायदेशीर ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.