Mint Store Ways Saam Tv
लाईफस्टाईल

Mint : आता पुदिन्याची पाने दीर्घकाळ ताजी राहतील, करा 'हे' झटपट उपाय...

Mint Store Ways : उन्हाळ्यामध्ये पुदिना आरोग्यास फायदेशीर आहे. त्यामुळे पुदिन्याचा अनेक पदार्थांध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळ्यामध्ये पुदिना आरोग्यास फायदेशीर आहे. त्यामुळे पुदिन्याचा अनेक पदार्थांध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पुदिन्याची पाने अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. पुदिना पोटाला गारवा देतो. आयुर्वेदात पुदिन्याच्या पानांना औषधी मानले जाते. आरोग्याच्या अनेक समस्यांवर पुदिन्याचे पान रामबाण उपाय आहे. त्वचेला हायड्रेटेड आणि मऊ ठेवण्यासाठी पुदिन्याची पाने उपयुक्त ठरतात.

सरबतमध्येआणि चटनीमध्ये पुदिन्याची पाने टाकल्यास पदार्थांची चव वाढते. आपण बाजारातून पुदिन्याची पाने विकत घेऊन येतो. पण काही दिवसातच ही ताजी पाने खराब होतात. अशा परिस्थितीत पुदिन्याची पानेन दीर्घकाळ ताजी ठेवण्यासाठी खाली दिलेले उपाय नक्की ट्राय करा.

पुदिन्याची पाने फ्रीजमध्ये झिपलॉक पिशवीमध्ये ठेवा

पुदिन्याची पाने नीट धुवून त्यातील पाणी काढून ही पाने छान कोरडी करून घ्यावी. एका बेकिंग शीटवर ही पाने ठेवून फ्रीजरमध्ये फ्रिज करून झिपलॉक पिशवीमध्ये स्टोर करावी.

पुदिन्याच्या पानांचे बर्फाच्या तुकड्यांमध्ये रुपांतर करा

पुदिन्याची पाने कापून बर्फाच्या ट्रेमध्ये पाणी टाकून फ्रीजमध्ये ठेवा. आवश्यकतेनुसार तुमच्या खाद्यपदार्थांमध्ये फ्रिज केलेले पुदिन्याच्या पानांचे बर्फाचे तुकडे घाला.

पाण्यात भिजवून ठेवा

पुदिन्याच्या पानांच्या देठाची टोके कापून पाण्यात बुडवून फ्रिजमध्ये ठेवा. पानांचे ऑक्सिडेशन टाळण्यासाठी पाने प्लास्टिकने झाकून ठेवा.

पेपर टॉवेलमध्ये पाने ठेवा

पुदिन्याची पाने सुरक्षित ठेवण्यासाठी पेपर टॉवेल पाण्यात बुडवा आणि त्यातील अतिरिक्त पाणी हलक्या हातांनी काढून घेऊन त्यावर पुदिन्याची पाने पसरवा. त्यानंतर ही पाने हवाबंद डब्यात ठेवा.

पुदिन्याच्या पानांना सुकवा

पुदिन्याची पाने स्वच्छ धूवून देठापासून वेगळी करून उन्हात वाळवा. पानं चांगली सुकल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.

व्हॅक्यूम सील

धुतलेली आणि वाळलेली पाने व्हॅक्यूम सीलबंद पिशवीत ठेवा आणि फ्रिजमध्ये स्टोर करा. यामुळे पानांचे ऑक्सिडेशन थांबेल.

Edited By: Shreya Maskar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Express: भंगारातून सरकारच्या तिजोरीत ८०० कोटींची भर, ७ वंदे भारत ट्रेन खरेदी करता येईल इतका पैसा कमावला

Shivani Surve Photos: 'देवयानी' फेम अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं अन् चाहत्यांच्या लागल्या नजरा

Farmer News : पावसानं तोंडचा घास हिरावला, आडवी झालेली पिकं बघून शेतकरी खचला; आत्महत्येचा प्रयत्न केला, तिसऱ्या दिवशी जग सोडलं

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे हत्येचा कट रचनाऱ्यांच्या निषेधार्थ उद्या आंबेजोगाईमध्ये मोर्चा

Ajit Pawar: फेटा काढला अन् टोपी घातली; अजित पवारांचं जोरदार भाषण, VIDEO

SCROLL FOR NEXT