OnePlus 12 5G Saam Tv
लाईफस्टाईल

50MP कॅमेरा, 5400mAh बॅटरी; OnePlus 12 5G भन्नाट फीचर्ससह लवकरच होणार लॉन्च

OnePlus 12 5G Launch : कंपनी कमी किमतीत ग्राहकांना उत्तम लुक आणि प्रीमियम फीचर्स असलेले स्मार्टफोन देते.

Shraddha Thik

OnePlus 12 5G Specification :

OnePlus ने फार कमी वेळात भारतीय बाजारपेठेत मजबूत पकड निर्माण केली आहे. कंपनी कमी किमतीत ग्राहकांना उत्तम लुक आणि प्रीमियम फीचर्स असलेले स्मार्टफोन देते. आता कंपनी नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन (Smartphone) OnePlus 12 5G वर काम करत आहे. त्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता या आगामी स्मार्टफोनच्या लॉन्चबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लीक झालेल्या माहितीनुसार, Oneplus 12 5G जबरदस्त फीचर्ससह येणार आहे. टिपस्टर योगेश बरार यांनी या स्मार्टफोनच्या लॉन्च टाइमलाइनचा खुलासा केला आहे. टिपस्टरवर विश्वास ठेवला तर कंपनी डिसेंबरमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च (Launch) करू शकते. OnePlus जानेवारी-फेब्रुवारीमध्ये OnePlus 12 भारतात लॉन्च होऊ शकतो.

OnePlus 12 पूर्वी, OnePlus भारतीय बाजारात OnePlus फोल्डेबल (OPEN), OnePlus Nord CE 3 आणि OnePlus Ace 2 Pro लॉन्च करू शकते.

तुम्हाला अनेक खास फीचर्स मिळतील

  • फोन लॉन्च होण्यापूर्वीच अनेक खास फीचर्स (Features) ऑनलाइन समोर आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार या डिव्हाईसमध्ये काहीतरी खास असणार आहे.

  • डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास, यात BOE कडून 2K इंच X1 (ओरिएंटल) डिस्प्ले मिळेल, जो 2600 nits पीक ब्राइटनेससह ऑफर केला जाईल. यामध्ये तुम्हाला Qualcomm चा लेटेस्ट फ्लॅगशिप Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर दिला जाईल.

  • याशिवाय, यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आणि हॅसलब्लाड अल्गोरिदमसह 50MP कॅमेरा युनिट देखील असू शकते.

  • RAM बद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही 24GB पर्यंत रॅम आणि 1TB स्टोरेज मिळवू शकता.

  • याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये 5400mAh बॅटरीसह 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

OnePlus 12 सोनीच्या विशेष सेन्सरसह येईल

  • OnePlus ने आपल्या चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती शेअर केली आहे की कंपनी आपल्या नवीन प्रीमियम फोनमध्ये Sony LYT-T808 मुख्य कॅमेरा सेन्सर सादर करणार आहे.

  • याआधी, कंपनीने असेही सांगितले होते की हा डिवाइस सोनी लिटिया 'पिक्सेल स्टॅक्ड' सेन्सरसह दिला जाईल.

  • यासोबतच या डिवाइसमध्ये 64MP OV64B पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स देखील उपलब्ध असतील.

हा सेन्सर खास का आहे?

आपल्याला माहित आहे की हा कंपनीचा फ्लॅगशिप प्रीमियम फोन आहे. अशा स्थितीत, हे दोन्ही कॅमेरा सेन्सर त्या पातळीवर नेण्यासाठी उपयुक्त ठरतील, जेणेकरून ग्राहकांना प्रीमियम अनुभव मिळू शकेल.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे टॉप लेव्हल इमेजिंग सुविधेसह येते आणि या तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर आहे. प्रिमियम फोनकडून ग्राहकांना इतकी अपेक्षा असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT