Morning Drinks For Glowing Skin Saam Tv
लाईफस्टाईल

Morning Drinks For Glowing Skin : सूर्यासारखी कायम चमकेल त्वचा, रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या 5 ड्रिंक्स; पिंपल्सही होतील गायब

5 Healthy Morning Drinks To Add To Your Diet : सतत येणाऱ्या पिंपल्स आणि काळपटलेल्या त्वचेमुळे वैतागले असाल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी हे ५ ड्रिंक्स प्या

कोमल दामुद्रे

Skin Care Tips :

त्वचा उजळवण्यासाठी आपण अनेकदा महागड्या उत्पादनांचा वापर केला जातो. वाढते प्रदूषण, चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.

त्वचा चमकवण्यासाठी वापरले जाणारे अनेक महागडे उत्पादने त्वचेसाठी नुकसान पोहोचवतात. जर तुम्ही देखील सतत येणाऱ्या पिंपल्स आणि काळपटलेल्या त्वचेमुळे वैतागले असाल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी हे ५ ड्रिंक्स प्या. जाणून घेऊया त्याबद्दल.

1. लिंबूपाणी

जर तुम्ही रोज सकाळची लिंबू पाणी (Lemon Water) प्यायले तर तुमची त्वचा निरोगी राहील. लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सीचा समृद्ध स्रोत आहे, जो शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो. हे प्यायल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते आणि त्वचाही चमकदार होते. हे कोलेजनच्या उत्पादनात देखील मदत करते आणि बारीक रेषा कमी करते. यासाठी सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या.

2. ग्रीन टी (Green Tea)

अनेकदा लोक सकाळची सुरुवात चहाच्या कपाने करतात. दुधाच्या चहाऐवजी ग्रीन टी प्यायल्यास त्वचेला खूप फायदा होतो. ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. यामध्ये व्हिटॅमिन ई देखील आहे. ज्यामुळे त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करते.

3. हळदीचे दूध (Milk)

हळदीचे दूधामुळे त्वचा निरोगी राहाण्यास मदत होते. त्यात दाहक -विरोधी गुणधर्म आढळतात. सकाळी ग्लासभर कोमट हळदीचे दूध प्यायल्याने सौंदर्य उजळण्यास मदत होईल.

4. नारळ पाणी

कोरड्या त्वचेसाठी नारळ पाणी अधिक फायदेशीर ठरु शकते. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियमसारख्या इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे त्वचेची चमक कायम राहते. नारळपाणी प्यायल्याने चेहऱ्यावरील डागही कमी होतात.

5. आवळा रस

आवळा ज्यूस हे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे. यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते. चमकदार त्वचेसाठी तुम्ही सकाळी आवळ्याचा रस पिऊ शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

SCROLL FOR NEXT