Hair Falls Issue : गळून गळून केस विरळ झाले आहेत? आहारात ६ प्रकारच्या बियांचा करा समावेश, होतील घनदाट

Food For Hair Loss : केसगळतीच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे अनेक तरुणांना टक्कल पडण्याची भीती सतावते.
Hair Falls Issue
Hair Falls Issue Saam tv
Published On

Hair Care Tips : केसगळतीच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे अनेक तरुणांना टक्कल पडण्याची भीती सतावते. केसगळतीसाठी आपण अनेक गोष्टींची काळजी घेतो. खाण्यापिण्यापासून ते अनेक महागड्या उत्पादनांचा वापर आपण करतो. इतके करुनही केस गळतीची समस्या काही कमी होत नाही.

केस गळतीच्या या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात बदल केला तर फायदा होईल. तुम्ही जे खाता ते तुमच्या केसांवरही परिणाम करतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही बियांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा आहारात समावेश केल्यास केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

Hair Falls Issue
Egg Hair Mask : कोरड्या-रुक्ष केसांपासून सुटका हवीये? अंड्यापासून बनवा हेअर मास्क, केस होतील सॉफ्ट अन् शाइन

1. भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी आढळते. भोपळ्याच्या बिया सॅलड्स किंवा भाज्यांमध्ये घालून तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे केसगळती थांबेल.

2. सूर्यफूल बिया

सूर्यफुलाच्या बियांमध्ये भरपूर पोषक असतात. ते केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. त्यामध्ये झिंक आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड देखील असतात, जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. तुम्ही ते नाश्त्यात ओट्स, दही (Curd), सूप, स्मूदी, भाज्या आणि सॅलड इत्यादींमध्ये वापरू शकता.

Hair Falls Issue
South Bombay Famous Place : दक्षिण मुंबईतील झक्कास ठिकाणं...,खाणं-फिरणं सगळं एकाच दिवसात होईल!

3. अंबाडी बिया

केस गळणे नियंत्रित करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अंबाडीच्या बियांचा समावेश करू शकता. यामुळे केस गळणे कमी होऊ शकते. या बिया रक्तातील साखर (Sugar) आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासही मदत करतात.

4. मेथी दाणे

केसांच्या वाढीसाठी मेथी दाणे खूप गुणकारी आहेत. केसांना (Hair) लावण्याव्यतिरिक्त तुम्ही ते खाऊ शकता. यामुळे केसांशी संबंधित समस्या कमी होतात.

Hair Falls Issue
Shirdi Trip In Budget : बजेटमध्ये फिरा शिर्डी; वन डे ट्रिप कशी कराल? जाणून घ्या सविस्तर

5. कांद्याच्या बिया

तुमच्या केसांना कांद्याच्या बियांपासून पोषण मिळू शकते. यामध्ये अँटी फंगल आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे तुमच्या केसांना अनेक समस्यांपासून मुक्त करु शकतात.

6. तीळ

केसांच्या वाढीसाठी तीळ खूप फायदेशीर मानले जाते. तिळात भरपूर खनिजे, जीवनसत्त्वे आणि फॅटी अॅसिड असतात जे केसांना चमक देतात. याचा उपयोग भाज्या, सॅलड इत्यादींमध्ये होतो. तिळापासूनही लाडू बनवू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com