Roti Making Mistake, Health News  Saam Tv
लाईफस्टाईल

Roti Making Mistake : चपाती बनवताना चुकूनही करु नका या चुका, आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

कोमल दामुद्रे

4 Common Mistake While Making Chapati :

भारतीय घरातील थाळी चपातीशिवाय अपूर्णच आहे. भारतातील बहुतेक घरांमध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या जेवणासाठी चपाती तयार केली जाते. हल्ली चपाती विकूनही बिझनेस केला जातो.

अनेकदा चपाती बनवताना आपण अशा अनेक चुका करतो. ज्याचा आपल्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. ज्यामुळे अन्नातील (Food) सर्व पोषक तत्व शरीरात पोहोचत नाही. जाणून घेऊया चपाती बनवताना कोणत्या चुका करुन नये.

1. पीठ मळल्यानंतर

पीठ मळून लगेचच चपाती बनवायला घेऊ नका. कारण पीठ मळून थोड्यावेळ ठेवल्याने ते आंबते. अशा पिठापासून बनवलेली रोटी मऊ आणि चांगली बनते. जी आरोग्याला (Health) अधिक फायदेशीर (Benefits) ठरते.

2. लोंखडी तवा

हल्ली नॉन स्टिक तव्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. जो आरोग्यासाठी हानिकारक ठरतो. चपाती बनवताना लोंखडी तव्याचा वापर करा. यामुळे शरीराला लोह पुरेशा प्रमाणात मिळते.

3. चपाती ठेवण्याची पद्धत

बहुतेक लोक चपाती गरम राहावी यासाठी हॉटकेसमध्ये मऊ ठेवण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइल पेपर वापरतात. चपाती गरम राहावी यासाठी या फॉइलचा वापर केला जातो. ज्यामुळे आरोग्याला हानी होते. बेक केल्यानंतर चपाती कपड्यात ठेवणे चांगले. यासाठी तुम्ही बटर पेपरचा वापर करु शकता.

4. कोणत्या पीठाची चपाती खाता?

हल्ली कामाच्या व्यापामुळे अनेक गृहिणींना घरात लक्ष द्यायला वेळ नसतो. यासाठी त्या घरात अधिकतर सामान हा रेडिमेड पद्घतीने आणतात. त्यातील एक पीठ. पॅकबंद पीठ अधिक प्रमाणात खाल्ले जाते. परंतु, ते आरोग्यासाठी हानिकारक आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

SCROLL FOR NEXT