Kawasaki Vulcan S
Kawasaki Vulcan S Kawasaki Vulcan S
लाईफस्टाईल

Cruiser Bikes in India: दमदार आणि पॉवरफुल! Kawasaki Vulcan S भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cruiser Bikes : प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Kawasaki India ने आपली जबरदस्त बाईक 2023 Vulcan S मिडलवेट क्रूझर बाजारात लॉन्च केली आहे. ज्याची किंमत 7.10 लाख रुपये आहे (एक्स-शोरूम, भारत). Kawasaki Vulcan S ला नवीन मॉडेल अपडेट देण्यात आले आहे. आता ही बाईक मेटॅलिक मॅट कार्बन ग्रे कलर स्कीमसह उपलब्ध आहे. या बाईकमध्ये कंपनीने अनेक आधुनिक फीचर्स दिले आहेत, याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Kawasaki Vulcan S : 659cc इंजिन पॉवरट्रेन

2023 Kawasaki Vulcan S ही भारतात कंपनीची चौथी बाईक आहे. जी 659cc पॅरलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिनसह लॉन्च करण्यात आली आहे. याचे इंजिन 7,500rpm वर 59.9bhp आणि 6,60pm वर 62.4Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकची मोटर 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. (Latest Marathi News)

Kawasaki Vulcan S : लूक आणि डिझाइनमध्ये कोणताही बदल नाही

अपडेटेड Vulcan S च्या लूक आणि डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. क्रूझरला सिंगल-पॉड हेडलॅम्प, टीयरड्रॉप-आकाराची इंधन टाकी, ब्लॅक फिनिशसह एक्सपोज्ड फ्रेम आणि लो-स्लंग स्टॅन्स मिळतात. यासोबतच या बाईकमध्ये कॉम्पॅक्ट एक्झॉस्ट आणि अलॉय व्हील्स उपलब्ध आहेत. (Latest Bike News)

Kawasaki Vulcan S : मिळणार 14-लिटरची इंधन टाकी

नवीन Kawasaki Vulcan S समोर 130mm प्रवासासह 41mm टेलिस्कोपिक फॉर्क्स वापरते. यात प्रीलोड अ‍ॅडजस्टेबिलिटी आणि 80mm प्रवासासह मागील बाजूस ऑफसेट मोनोशॉक आहेत. ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले, तर याला 300mm डिस्क आणि मागील बाजूस 250mm सिंगल डिस्क मिळते. यात 14-लिटरची इंधन टाकी मिळते. बाईकच्या सीटची उंची 705mm आहे. याशिवाय त्यात 130mm ग्राउंड क्लीयरन्स उपलब्ध आहे. यात 18-इंचाचे फ्रंट व्हील आणि 17-इंचाचे मागील चाक आणि मानक म्हणून ड्युअल-चॅनल एबीएससह येते.

Royal Enfield Super Meteor 650 ला देणार टक्कर

Kawasaki Vulcan S ही Royal Enfield Super Meteor 650 चा थेट प्रतिस्पर्धी आहे. ज्याची किंमत जवळपास निम्मी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT