Best 5G Mobile Phones Under 20000: OnePlus ने भारतात आपला सर्वात परवडणारा फोन OnePlus Nord CE 3 Lite लॉन्च केला आहे. हा फोन 6.72 इंच डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट सह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये Snapdragon 695 5G प्रोसेसर आणि 16 GB पर्यंत रॅम सपोर्ट आहे. OnePlus Nord CE 3 Lite दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो आणि फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. याच फोनबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
OnePlus Nord CE 3 Lite : किंमत
OnePlus Nord CE 3 Lite 19,999 रुपये किमतीत सादर करण्यात आला आहे. OnePlus Nord CE 3 Lit पेस्टल लाइम आणि क्रोमॅटिक ग्रे कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत साइटवरून खरेदी करता येईल. (Latest Marathi News)
OnePlus Nord CE 3 Lite : स्पेसिफिकेशन
फोनमध्ये 6.72-इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे. जो 1,800 x 2,400 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. डिस्प्लेसोबत 120 Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. डिस्प्लेसह 680 मिट्सची ब्राइटनेस आणि 240 Hz चा टच सॅम्पलिंग रेट आहे. यात डिस्प्लेसह गोरिल्ला ग्लास सपोर्ट देण्यात आला आहे. (Oneplus Latest Phone)
फोनमध्ये 6nm स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर आणि 8 GB पर्यंत RAM सह 256 GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज आहे. याचा रॅम वर्च्युअली 16 GB पर्यंत वाढवता येतो. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. सेफ्टीसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. Android 13 आधारित OxygenOS 13 फोनमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये स्टिरीओ स्पीकरचाही सपोर्ट देण्यात आला आहे.
OnePlus Nord CE 3 Lite : कॅमेरा
वनप्लसच्या नवीन फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 108 मेगापिक्सल्सच्या फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. सेकंडरी कॅमेरा 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे आणि तिसरा कॅमेरा 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनसह 1080p 30fps पर्यंतचे व्हिडीओ रेकॉर्ड केले जाऊ शकतात. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी पॅक मिळतो. जो 67W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.