Cardamom for Diabetes saam tv
लाईफस्टाईल

Cardamom for Diabetes: 1 वेलचीमुळे शुगर लेव्हल होऊ शकते कमी, डायबिटीजच्या रुग्णांनी अशा पद्धतीने करा सेवन!

Cardamom and diabetes: डायबिटीजमध्ये ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार महत्त्वाचा असतो. वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्ससह काही पोषक घटक आढळतात. वेलचीचं पाणी किंवा साखर न घातलेला चहा आहाराचा भाग म्हणून घेता येऊ शकतो. मात्र औषधांचा पर्याय म्हणून वेलचीचा वापर करू नये.

Surabhi Jayashree Jagdish

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीचा आहार आणि अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे अनेकांना डायबिटीजचा त्रास होत आहे. डायबिटीजमध्ये शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे ती नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं असतं. यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या औषधांसोबतच आहाराकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.

ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश केला जाऊ शकतो. यामध्ये इलायची म्हणजेच वेलचीचाही समावेश होतो. वेलचीचं पाणी किंवा वेलचीचा चहा घेतल्याने डायबिटीजच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो, असं सांगितलं जातं. जाणून घेऊया वेलचीचे फायदे आणि तिचं सेवन कसं करावं.

वेलचीचा वापर कशासाठी होतो?

वेलचीचा वापर पदार्थांची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी केला जातो. मात्र वेलची केवळ स्वयंपाकघरात वापरण्यापुरतीच मर्यादित नाही. आरोग्यासाठीही तिचे काही फायदे सांगितले जातात. डायबिटीज असलेल्या व्यक्तींसाठीही वेलची फायदेशीर ठरू शकते. वेलचीचं सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते.

वेलचीत असणारे पोषक घटक असतात?

वेलचीमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. त्यामध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्सचा समावेश होतो. वेलचीचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असल्याचं सांगितलं जातं. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांमुळे रक्तातील साखर वेगाने वाढत नाही. त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी वेलचीचा उपयोग होऊ शकतो.

इन्सुलिन वाढण्यास मदत?

वेलचीचं सेवन केल्याने शरीरातील इन्सुलिनची मात्रा वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते. मात्र डायबिटीजच्या रुग्णांनी औषधं बंद करून केवळ वेलचीवर अवलंबून राहू नये. डॉक्टरांनी दिलेली औषधं आणि त्यांचा सल्ला सुरू ठेवणं महत्त्वाचं आहे.

वेलचीचा चहा कसा बनवायचा?

डायबिटीजच्या रुग्णांना वेलचीचा चहा घेता येऊ शकतो. यासाठी सर्वात आधी एक कप पाणी घ्या आणि ते गरम करा. त्यामध्ये हिरवी वेलची आणि थोडं आलं घाला. हे मिश्रण काही वेळ उकळू द्या. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि चहाप्रमाणे प्या. रोज वेलचीचा हा चहा घेतल्याने ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फक्त १५० रुपयांत बीडहून पुण्यात टच, पाहा कुठल्या स्थानकांवर थांबणार ट्रेन? जाणून घ्या बुकींगची वेळ

Maharashtra News Live Update: काजू बदाम खाल्ल्याने कृषिमंत्री दत्ता भरणे यांचा हिंगोलीत शेतकऱ्यांकडून निषेध

ब्रश करूनही दात पिवळे अन् कमकुवत होतात? तुमच्या 'या' 5 नेहमीच्या चुका आहेत कारणीभूत

Samosa calories: 1 समोसा आणि 2 जिलेबी खाल्ल्यानंतर किती वेळ वर्कआऊट केलं पाहिजे?

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातून पहिला स्पर्धक बाहेर; रोहेद खानच्या चाहत्यांना धक्का

SCROLL FOR NEXT