Blue vs White Aadhaar Card meta ai
Image Story

पांढरं आणि निळ्या आधार कार्डात काय फरक? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

Blue Aadhaar Card vs White Aadhaar Card: पांढऱ्या रंगाचे आधार कार्ड आपण सगळेच वापरतो. मग निळे आधार कार्ड कोण वापरतं हे जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

Sakshi Sunil Jadhav
White Aadhaar Card

आधार कार्ड हा सर्वात महत्त्वाच्या भारतीय नागरिकांचा पुरावा मानला जातो. बँक खातं उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत याचा वापर होतो. पण तुम्हाला माहिती आहे का, लहान मुलांसाठी निळ्या रंगाचे आधार कार्ड दिले जाते? चला जाणून घेऊयात ५ महत्त्वाचे मुद्दे.

Baal Aadhaar Registration

पाच वर्षांखालील मुलांना मिळते निळे आधार कार्ड

UIDAI कडून पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी निळ्या रंगाचे बाल आधार कार्ड जारी केले जाते. यामध्ये मुलाचा फोटो, नाव आणि जन्मतारखेसारखी माहिती असते.

UIDAI Aadhaar Rules

पांढऱ्या आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक माहिती

पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींच्या आधार नोंदणीमध्ये बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळांची (Iris) माहिती घेतली जाते. त्यामुळे नियमित आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक तपशील नोंदवलेले असतात.

Child Aadhaar Biometric Update

बाल आधारमध्ये बायोमेट्रिक माहिती घेतली जात नाही

लहान मुलांचे बोटांचे ठसे आणि डोळ्यांची रचना पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे पाच वर्षांखालील मुलांचे फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅन घेतले जात नाहीत.

Child Aadhaar Biometric Update

पालकांच्या आधारशी जोडले जाते बाल आधार

मुलाचे बाल आधार कार्ड तयार करताना आई किंवा वडिलांपैकी एका पालकाच्या आधार क्रमांकाशी ते जोडले जाते. यामध्ये मुलाची वैयक्तिक माहिती आणि फोटो नोंदवला जातो.पाच वर्षांनंतर बायोमेट्रिक अपडेट केलेल्या मुलांच्या आधारमध्ये वयाची १५ वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार! सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

शेख हसीना बांग्लादेशात परतणार? बांग्लादेशात पुन्हा हिंसाचार उफाळणार?

Health Tips : भात खाल्ल्यानंतर लगेच झोप येतेय? शरीरात नक्की काय घडतं, जाणून घ्या

Rohit Sharma Mumbai Indians Captain : मुंबईचा राजा! रोहित शर्मा पुन्हा MI चा कर्णधार, ५.४५ चं कोडं अखेर सुटलं; पाहा खास व्हिडीओ

Mumbai : मुंबईत धक्कादायक घटना! रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग; आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT