GST 2.0 update today saam tv
Image Story

GST 2.0 from Today: आजपासून GST 2.0 लागू, काय महाग? काय स्वस्त?

Cheaper Goods : आजपासून GST 2.0 लागू झाला आहे. दैनंदिन वापरातील वस्तू, आरोग्य सेवा, कृषी साधनं, मध्यमवर्गीय गाड्या व घरगुती उपकरणं यांवर जीएसटी कमी होऊन वस्तू स्वस्त होणार आहेत.

Sakshi Sunil Jadhav
GST 2.0 update today

दैनंदिन वापरातल्या वस्तुंमधील पुढील वस्तु आता स्वस्त होणार आहेत. याबद्दल प्रोटक्डनुसार किती टक्के सवलत मिळणार पुढील बातमीत आपण जाणून घेणार आहोत.

GST 2.0 update today

हेअर आईल, शॅम्पू, टुथपेस्ट, ब्रश, साबण, शेव्हिंग क्रीवर आधी १८ टक्के GST होता. जो कमी होऊन ५ टक्के झाला होणार आहे.

GST 2.0 update today

दूग्धजन्य पदार्थांवरचा सुद्धा GST हटवला. त्यामध्ये बटर, तूप, चीझ, डेअरी स्प्रेड, भांडी, बाळांचे डायपर, दुधाच्या बॉटल्स, शिलाई मशीन आणि त्यावरील GST १२ टक्क्यांहून 5 टक्यांवर येणार आहे.

GST 2.0 update today

आरोग्य सेवा क्षेत्रावरील GST सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. त्यामध्ये औषधांवरील GST हटवला, लाईफ इन्शुरन्स, वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीवरुन GST हटवला आहे. यामध्ये थर्मामीटरवरील GST १८ टक्क्यांहून ५ टक्के GST ठेवण्यात आला आहे. तर चष्मा, वैद्यकीय ऑक्सिजन, तपासणीच्या किट्सवर आता ५ टक्के GST ठेवण्यात आला आहे.

GST 2.0 update today

कृषी क्षेत्रामध्ये ट्रॅक्टर्स, काही ठराविक कीटकनाशकं, ठिबक सिंचनासाठी लागणारे भाग आणि स्प्रिंकलर्सवर १२ टक्यांचा GST ५ टक्के करण्यात आला आहे. तर ट्रॅक्टरचा १८ टक्के GST ५ टक्के करण्यात आला आहे.

GST Council

मिडल क्लासच्या गाड्या आता स्वस्तात मिळणार आहेत. पेट्रोल, LPG, CNG आणि हायब्रिड, डिझेलच्या गाड्या २८ टक्के GST हून १८ टक्के करण्यात आला आहे.

GST

काही घरगुती उपकरणं स्वस्त करण्यात आली आहेत. त्यामध्ये एअर कंडिशनर, ३२ इंचांपेक्षा मोठे TV,मॉनिटर आणि प्रोजेक्टर, डिश वॉशिंग मशीन यांवरील GST २८ टक्क्यांहून १८ टक्के करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Bodies Election: नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरताय? अर्ज कसा कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Soft Chapati Tips: चपात्या कडक होतात, फुगतच नाहीत? नेमकी कुठे चूक होते? कणिक मळताना घाला '१' पदार्थ

Maharashtra Live News Update: केंद्रीय पथकाकडून धाराशिवमधील पूरग्रस्त भागाची पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

BSA Thunderbolt ADV: चिखल असो कि खडकाळ रस्ता, तरीही सुसाट धावेल 'थंडरबोल्ट' अ‍ॅडव्हेंचर बाईक; 2026 मध्ये भारतात लाँच

लवकरच पूर्ण होणार रिंगरोड, कल्याण-डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार? आयुक्तांनी सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT