Image Story

Shopping Tips: नव्या वर्षासाठी ऑनलाईन खरेदी करताय? मग 'या' टीप्स ठेवा डोक्यात नाहीतर फसाल

Tips of Shop Smart: ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरा करण्यासाठी अनेकजण काही वस्तूंची खरेदी करतात. आता बहुतेकजण ऑनलाईनने खरेदी करतात. पण सायबर क्राइम वाढल्याने अनेकांची ऑनलाईन फसवणूक होते. अनेकांना गंडा घातला जातो.

Bharat Jadhav

बनावटी हॉलिडे ई-कार्डस् आणि फिशिंग स्कॅमपासून सावधान:

सायबर गुन्‍हेगार मालवेअर इन्‍स्‍टॉल करण्‍यासाठी अनेकदा खोटे ईमेल्‍स किंवा हॉलिडे-थीम ईकार्डचा वापर करतात. ज्ञात नसलेल्‍या लिंक्‍सवर क्लिक करणे टाळा आणि प्रत्‍यक्ष रिटेलर्सच्‍या वेबसाइटवर ऑफर्सचे सत्‍यापन करा.

विश्‍वसनीय वेबसाइट्सवरूनच करा खरेदी:

ऑनलाइन शॉपिंग करताना विश्‍वसनीय वेबसाइट्सचा वापर करणे महत्त्वाचे आहे. 'https'सह सुरूवात होणाऱ्या आणि पॅडलॉक आयकॉन दाखवणाऱ्या यूआरएलची खात्री घ्‍या. यात सुरक्षित कनेक्‍शनचा संकेत मिळत असतो.

अधिक सुरक्षिततेसाठी क्रेडिट कार्डचा वापर करा:

कार्ड पेमेंट्स टू-फॅक्‍टर ऑथेन्टिकेशन (२एफए), टोकनायझेशन आणि एसएसएल हँडशेक तंत्रज्ञान अशा वैशिष्‍ट्यांच्‍या माध्‍यमातून फसवणूकीपासून प्रबळ संरक्षण देतात.

अलर्टस् सेट अप करा आणि नियमितपणे व्‍यवहारांवर देखरेख ठेवा:

दररोजच्या धावपळीदरम्‍यान खरेदींवर देखरेख ठेवणे अवघड ठरू शकते. कोणत्‍याही अनधिकृत व्‍यवहारांना ओळखण्‍यासाठी पेमेंट नोटिफिकेशन्‍स सेट अप करा आणि वारंवार कार्ड किंवा पेमेंट अॅप स्‍टेटमेंट्स तपासून घ्या.

वैयक्तिक व आर्थिक माहितीचे संरक्षण करा:

वैयक्तिक व आर्थिक तपशील सेव्‍ह व शेअर करण्‍याबाबत सावधगिरी बाळगा. तसेच, सार्वजनिक वाय-फायवर शॉपिंग करणे टाळा, कारण अनएन्क्रिप्‍टेड नेटवर्क्‍समुळे सायबरगुन्‍हेगारांना डेटा इंटरसेप्‍ट करणे डेटा मिळवणं सोपं असतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

SCROLL FOR NEXT