Delhi Blast Saam Tv
Image Story

Delhi Blast: दिल्लीत शक्तीशाली स्फोट, आगीचे लोळ, धुराचे लोट; रस्त्यावर रक्ताचा सडा, हादरवून टाकणारे PHOTO

Delhi Red Fort Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे दिल्ली हादरली. स्फोटानंतर अनेक वाहनांना आग लागली आणि धुराचे लोट सगळीकडे पसरले. या स्फोटानंतरचे भयंकर फोटो समोर आले आहेत...

Priya More
Delhi Blast

दिल्ली सोमवारी संध्याकाळी भयंकर स्फोटाने हादरली. दिल्लीतल्या लाल किल्ल्यासमोर एका कारमध्ये स्फोट झाला.

Delhi Blast

कारमध्ये झालेला स्फोट इतका मोठा होता की आसपासचा संपूर्ण परिसर आवाजाने हादरला. सर्वजण घाबरून इकडे तिकडे पळू लागले.

Delhi Blast

स्फोटानंतर कारला भीषण आग लागली. या स्फोटानंतर आसापसच्या अनेक वाहनांनी देखील पेट घेतला. त्यामुळे परिसरात धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा पाहायला मिळाल्या.

Delhi Blast

या स्फोटाच्या घटनेमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. तर २४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Delhi Blast

स्फोटाची ही घटना ६ वाजून ५५ मिनिटांनी घडली. त्यावेळी लाल किल्ला परिसरात मोठी गर्दी होती. वर्दळीच्या परिसरात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.

Delhi Blast

हा स्फोट नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही. घटनास्थळी दिल्ली पोलिसांनी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.

Delhi Blast

घनटास्थळी दिल्ली पोलिस, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहे. बचावकार्य आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Delhi Blast

या घटनेमध्ये जखमी झालेल्या सर्वांना रुग्णवाहिकेतून आसपासच्या रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharat Case : 'खरातला मारुन मोकळं व्हा' खरातच्या वासनांधतेवर भिडेंचा भडका

रुग्णालयातील चिल्ड्रेन वॉर्डला आग, ४० चिमुकल्यांचे प्राण धोक्यात, जीवाच्या आकांताने पालकांची पळापळ, नेमकं काय घडलं?

कल्याणजवळ भयंकर अपघात, मेलखाली व्यक्तीचा मृत्यू; इंजिनमध्ये अडकले मृतदेहाचे तुकडे, मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली

Sangli Crime:चोरी केल्याच्या संशयातून बापाने दोन मुलींना उलटं टांगलं; एक मुलीचा मृत्यू, दुसरीवर उपचार सुरू

हिमालयात दिसला हनुमान? बर्फात फिरतानाचा हनुमानाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT