भारतातली पहिली बुलेट ट्रेन सुरू होण्याची वाट आता आणखी जास्त दिवस पाहावी लागणार नाही. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रोजेक्टचं काम वेगाने सुरू आहे. या बुलेट ट्रेन धावण्याची तयारी केली जातेय. महत्त्वाचं म्हणजे, या बुलेट ट्रेन मार्गावरच्या सुरत स्टेशनचे काही सुंदर फोटो रेल्वे मंत्रालयाने शेअर केले आहेत.
देशातली पहिली बुलेट ट्रेन सेवा २०२७ च्या शेवटच्या तिमाहीत सुरू करण्याचे नियोजन आहे. यामुळे भारताच्या रेल्वे प्रवासात मोठा बदल होणार आहे.
सुरुवातीला गुजरातमधील सुरत आणि वापी या दोन शहरांदरम्यान बुलेट ट्रेन धावण्याची तयारी सुरू आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मार्गाचा विस्तार केला जाणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुरत स्टेशनचे सुंदर इंटिरियर दिसत आहे. स्टेशनची रचना आधुनिक आणि आकर्षक पद्धतीने करण्यात आली आहे.
स्टेशनच्या छतावर कॅसेट एसी युनिट्स दिसत आहेत. त्यामुळे स्टेशन परिसर वातानुकूलित ठेवण्याची व्यवस्था असल्याचे फोटोंमधून दिसून येते.
सुरत बुलेट ट्रेन स्टेशनवर एस्केलेटर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाणे अधिक सोयीचे होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने स्टेशनचा वरून घेतलेला फोटोही शेअर केला आहे. यात स्टेशनची भव्य रचना आणि त्याचा एकूण आकार पाहायला मिळतो.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरवरील सुरत-बिलीमोरा सेक्शनमध्ये ओव्हरहेड इलेक्ट्रिकल इक्विपमेंट (OHE) सिस्टीम यशस्वीपणे सुरू करण्यात आली आहे. बुलेट ट्रेनच्या संचालनासाठी ही महत्त्वाची पायरी मानली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.