Zodiac Signs  Saam tv
राशिभविष्य

Zodiac Signs: 'या 'राशींवर गुरू ग्रह खूश, नव्या वर्षात करणार धनाचा वर्षाव, करिअरमध्ये होईल प्रगती

Guru Grah : वैदिक ज्योतिषाच्या अनुसार गुरू ग्रह भाग्यचा स्वामी आहे. या ग्रहाचा चार राशींवर विशेष कृपा असते. गुरूच्या कृपेने लोक ज्ञानी, बुद्धिमान आणि धनवान बनतात.

Bharat Jadhav

गुरू हे देवांचे गुरू आहेत म्हणून त्यांना देवगुरु असेही म्हणतात. हा ग्रह ज्ञान, धर्म, न्याय, संपत्ती, वैवाहिक जीवन, संतती सुख आणि समाजसेवेशी संबंधित आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरू हा सर्वात शुभ ग्रह मानला जातो. कुंडलीतील गुरूची स्थिती व्यक्तीच्या जीवनावर खूप प्रभाव पाडते. गुरू ग्रह जातकांना धन आणि सूख समृद्धी मोठ्या प्रमाणात देते. नऊ ग्रहांपैकी गुरू हा निती, न्याय आणि समुपदेशनाचा कारक मानला जातो.

वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरूला दोन राशींचे स्वामित्व दिले गेले आहे. या राशी आहेत, धनु आणि मीन. कालपुरुष कुंडलीत, धनु रास ९व्या घरात आहे, जे भाग्याचे स्थान आहे. तर यामुळेच गुरू हा सूर्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो, कारण तो भाग्यासाठी जबाबदार ग्रह आहे. ज्यांना नशिबाची साथ नसते ते आयुष्यभर प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करतात. ज्योतिषशास्त्रीय नियमांनुसार गुरू कर्क राशीत उच्च आणि मकर राशीत दुर्बल आहे. तसेच आठवड्याचा ५ वा दिवस म्हणजे गुरुवार देवगुरूला समर्पित आहे.

या चार राशींना विशेष आशीर्वाद

गुरूच्या कृपेने माणूस ज्ञानी, बुद्धिमान आणि विद्वान बनतो. ते शिक्षण आणि अभ्यासात रस वाढवतात. जीवनात समृद्धी आणि आर्थिक स्थिरता प्रदान करत असतात. सध्या गुरू प्रतिगामी आहे आणि ४ फेब्रुवारी २०२५ रोजी थेट माघारी परतणार आहे. दरम्यान जरी सर्व १२ राशींवर गुरू ग्रहाचा आशीर्वाद असतो. परंतु गुरू ग्रह ४ राशीच्या लोकांवर अधिक कृपा करतात. त्यांच्यावर धनाचा वर्षाव करतात.

कर्क

या राशीचे चौथे चिन्ह कर्क आहे, चंद्राचे चिन्ह यात बृहस्पति उच्च आहे. ज्योतिषशास्त्राच्या सिद्धांतानुसार, या राशीमध्ये गुरू सर्वात शक्तिशाली आहे. गुरू ग्रह नेहमी या राशीच्या लोकांवर आशीर्वाद देत असतात. प्रत्येक वेळी त्यांना कठीण समस्यांमधून बाहेर काढत असतात. या नव्या वर्षात २०२५ मध्ये या राशीचे लोक अमाप पैसा कमवू शकणार आहेत. नोकरदार लोकांना पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कुटुंबात चांगली बातमी मिळेल. उदाहरणार्थ, लग्न किंवा बाळाचा जन्म. गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात परतावा.

सिंह

सिंह राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व, निर्भयता आणि सर्जनशीलता हे जन्मजात गुण असतात. या राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्य या जातकांना समाजाचे नेतृत्व करण्याचे गुण देतात, परंतु या गुणामध्ये, गुरू ग्रह निती, न्याय आणि नैतिकता वाढविण्यासाठी जास्त योगदान देत असतो. या गुणांमुळे माणसाला विशेष प्रसिद्धी मिळते. या नव्या वर्षात या राशीचे लोक प्रचंड लोकप्रियतेसह भरपूर पैसे कमवतील. शिक्षण आणि करिअरमध्ये मोठे यश मिळेल.

धनु

धनु राशीचक्रात नव्या स्थानी आहे. धनु, अग्नी तत्वाशी संबंधित आहे. या राशीचे लोक न्यायी, तार्किक, सर्जनशील आणि स्वतंत्र विचारांचे असतात. त्यामागे कारण म्हणजे या राशीचा स्वामी गुरू आहे. या राशीच्या लोकांवर गुरू ग्रहाचा आशीर्वाद नेहमी असतो. नव्या वर्षात २०२५ मध्येही ही राशी गुरूच्या विशेष कृपेखाली राहील. हे वर्ष या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे. परदेशात जाण्याचा योग्य या राशीतील काही लोकांना येणार आहे. उच्च शिक्षणाची संधी काहींना मिळेल. स्थावर मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. तर वैवाहिक जीवनात आनंद आणि सौहार्द वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT