
नवीन वर्षाची सुरुवात झालीय. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही लोकांनी अनेक संकल्प निश्चित केली आहेत. नव्या वर्षात आर्थिक भरभराट आणि समुद्धी मिळावे यासाठी सर्व जण प्रयत्नशील आहेत. नव्या वर्षात प्रगती व्हावी यासाठी आग्रही असतात. त्यामुळे बहुतेकजण भविष्य पाहणाऱ्या व्यक्तीकडे पुढील वर्ष कसे असेल याची विचारणा करतात. बाबा वेंगा यांनी यांनी २०२५ बाबत भाकीत केलंय.
बाबा वेंगा यांना लहानपणी डोळे नव्हते, पण त्यानंतरही त्यांनी अनेक अचूक अंदाज वर्तवले आहेत. त्यांना बाल्कनचा नॉस्ट्राडेमस असेही म्हटलं जातं. बाबा वेंगा यांनी २०२५ मध्ये पाच राशींबद्दल काही भाकीत केलंय. या पाच राशीचे लोक भरपूर पैसे कमावतील. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, मेष, वृषभ, कर्क, मिथुन आणि कुंभ या पाच राशी आहेत ज्यांना यावर्षी भरभराट होणार आहे.
बाबा वेंगा यांच्यानुसार २०२५ हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी खूप चांगले असणार आहे. त्यांना भरपूर आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. या राशीचे लोक गतिमान आणि महत्वाकांक्षी आहेत. त्यांना नवीन आर्थिक संधी मिळतील, ज्याचा ते लाभ घेतील. हे प्रामुख्याने धोरणात्मक गुंतवणूक आणि प्रयत्नांमुळे होईल.
वृषभ राशीचे लोक खूप मेहनती असतात आणि त्यांच्या आर्थिक बाबतीत नेहमी सतर्क असतात. यावर्षी वृषभ राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करतील आणि त्यांना आर्थिक लाभ मिळेल. या राशीतील काही लोक दीर्घकालीन गुंतवणूक देखील करतील. त्यांना स्थिरता आणि वाढ मिळेल. बाबा वेंगा यांनी भाकीत केले आहे की, त्यांच्यापैकी काही त्यांच्या चिकाटीमुळे संपत्ती निर्माण करण्याच्या केंद्रित दृष्टिकोनामुळे करोडपती बनू शकतात.
२१ जून ते २२ जुलै दरम्यान जन्मलेल्या लोकांची राशी कर्क आहे. कर्क राशीचे लोक खूप अंतर्ज्ञानी असतात, जे त्यांना योग्य निर्णय घेण्यास आणि समस्यांवर सहज मात करत असतात. बाबा वेंगा यांनी देखील कर्क राशीच्या लोकांसाठी भविष्यवाणी केलीय. त्यांच्या मते, २०२५ मध्ये ते योग्य गुंतवणूक करून व्यवसाय भागीदारी करून किंवा सर्जनशील कार्यांद्वारे मोठे आर्थिक लाभ मिळतील.
कुंभ राशीच्या लोकांसाठीही हे वर्ष ऐतिहासिक ठरेल. शनीच्या मजबूत प्रभावाने प्रेरित होऊन, कुंभ राशीच्या लोकांना सर्जनशील उर्जेच्या अविश्वसनीय वाढीचा फायदा होईल, असं भाकीत बाबा वेंगा यांनी केलंय. कुंभ राशीच्या लोकांना त्यांची मर्यादा वाढवावी लागेल. धाडसी उद्दिष्टे साध्य करता तेव्हा आव्हाने संधींमध्ये बदलतात. करिअरमध्ये उंची गाठण्यात मदत होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.