Lucky zodiac signs saam tv
राशिभविष्य

Lucky zodiac signs: आजचा दिवस का आहे विशेष? पंचांग, ग्रहस्थिती आणि चार भाग्यवान राशी जाणून घ्या

Auspicious Tithi and Nakshatra: हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात प्रत्येक दिवसाचे स्वतःचे एक विशेष महत्त्व असते. आजचा सोमवार तिथी, वार आणि ग्रहांच्या स्थितीमुळे अत्यंत शुभ बनला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज 24 नोव्हेंबर 2025 असून हा दिवस धार्मिकदृष्ट्या फार शुभ मानण्यात येतो. आज चंद्र धनु राशीत भ्रमण करतोय. त्यामुळे आध्यात्मिक विचारांना चालना मिळण्यास मदत होणार आहे. याशिवाय तर शुक्ल पक्ष हा नवीन कार्यांची सुरुवात, संकल्प, पूजा आणि सकारात्मक कामांसाठी अनुकूल मानली जाते. आजचे ग्रहयोग काही राशींना विशेष लाभ देणारे आहेत.

आजचं पंचांग तपशील

  • तिथि: शुक्ल चतुर्थी

  • नक्षत्र: पूर्वाषाढा

  • करण: वणिज

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • योग: शूल (12:37:23 PM पर्यंत)

  • वार: सोमवार

  • सूर्योदय: 06:42:24 AM

  • सूर्यास्त: 05:25:19 PM

  • चंद्र उदय: 10:09:02 AM

  • चंद्रास्त: 08:36:17 PM

  • चंद्र राशी: धनु

  • ऋतु: हेमंत

  • शक संवत्: 1947

  • विक्रम संवत्: 2082

  • माह (अमान्ता): मृगशिरा

  • माह (पुर्निमान्ता): मृगशिरा

अशुभ काल

  • राहुकाल: 08:02:45 AM ते 09:23:07 AM

  • यमघंट काल: 10:43:29 AM ते 12:03:51 PM

  • गुलिकाल: 01:24:13 PM ते 02:44:35 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त: 11:42:00 AM ते 12:24:00 PM

कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार लकी?

धनु राशी

चंद्र आज तुमच्या राशीत असल्याने अत्यंत चांगला दिवस ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जर काही कामं अडकली असतील तर ती मार्गी लागण्यास मदत होणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे.

सिंह राशी

आजच्या दिवशी तुम्हाला कामात अनपेक्षित यश मिळण्याची शक्यता दिसून येतेय. वरिष्ठांकडून कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती दिसून येणार आहे.

मेष राशी

दिवस उत्साहवर्धक आणि सकारात्मक असण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामांना वेग मिळणार आहे. आर्थिक निर्णय आज यशस्वी ठरणार आहे. कुटुंबातून सहकार्य मिळू शकणार आहे.

कुंभ राशी

नवीन संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कामात स्थिरता येईल आणि मनातील तणाव कमी होणार आहे. व्यवहारांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अहिल्यानगर मनपा निवडणुकीत अजित पवार गटाच्या कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड...

Beed Crime: २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, ऊस तोडणीसाठी करताना भयंकर घडलं; बीड हादरले

Ladki Bahin Yojana: नोव्हेंबरचे ₹१५०० जमा; लाडकीला डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा

Mumbai Local: नव्या वर्षाचं भन्नाट स्वागत, १२ वाजता लोकलच्या हॉर्नने CSMT स्थानकात आवाज घुमला, मुंबईकरांचा जल्लोष अन् डान्स, व्हिडिओ व्हायरल

Leftover Rice 5 Dishes : रात्री उरलेल्या भातापासून बनवा या ५ टेस्टी आणि झटपट डिशेस

SCROLL FOR NEXT