Panchang today horoscope SAAM TV
राशिभविष्य

Horoscope benefits: आजच्या दिवशी कुणाला मिळणार लाभ? पाहा २९ डिसेंबरचं पंचांग आणि राशीभविष्य

daily horoscope astrology predictions: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक दिवस वेगवेगळ्या राशींना वेगवेगळे संकेत देतो. आज म्हणजेच २९ डिसेंबर हा दिवस काही राशींसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज २९ डिसेंबर असून चंद्र मीन राशीत असल्यामुळे संवेदनशीलता, कल्पकता आणि अंतर्मुख विचारांना अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे. यावेळी धार्मिक कार्य, ध्यान, लेखन, सर्जनशील कामं तसंच भावनिक निर्णयांसाठी आजचा दिवस उपयुक्त ठरू शकणार आहे. चला तर पाहूया आजचं सविस्तर पंचांग, शुभ मुहूर्त आणि आज कोणत्या राशींना लाभ होणार आहे.

आजचं पंचांग

  • तिथि – शुक्ल नवमी

  • नक्षत्र – रेवती

  • करण – कौलव

  • पक्ष – शुक्ल पक्ष

  • योग – परिघ (सकाळी ०७:३७:०३ पर्यंत)

  • दिन – सोमवार

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – ०७:०३:४९ AM

  • सूर्यास्त – ०५:३४:५१ PM

  • चंद्र उदय – १२:५३:४६ PM

  • चंद्रास्त – ०१:१९:१३ AM

  • चंद्र राशि – मीन

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – १९४७

  • विक्रम संवत् – २०८२

  • माह – अमान्ता – पौष

  • माह – पूर्णिमान्ता – पौष

अशुभ मुहूर्त

राहुकाल – ०८:२२:४१ AM ते ०९:४१:३४ AM

यमघंट काल – ११:००:२७ AM ते १२:१९:२० PM

गुलिकाल – ०१:३८:१३ PM ते ०२:५७:०६ PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – ११:५८:०० AM ते १२:४०:०० PM

आजच्या दिवशी कोणत्या राशींना मिळणार लाभ

मीन

चंद्र आज तुमच्या राशीत असल्यामुळे मानसिक समाधान आणि आत्मिक शांती मिळणार आहे. जुने प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामांमध्ये यश मिळणार आहे.

कर्क

भावनिक स्थैर्य मिळणार आहे. यावेळी कुटुंबाशी नातेसंबंध अधिक दृढ होणार आहेत. घरगुती निर्णयांसाठी दिवस अनुकूल आहे. मानसिक तणाव कमी होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करता येणार आहे. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सावध पण सकारात्मक निर्णय होणार आहेत.

वृषभ

नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. आत्मविश्वास वाढेल आणि दिवस समाधानकारक जाईल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ७१०० रुपयांनी स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Maharashtra Live News Update: पुण्यात महाविकास आघाडीच ठरलं! काँग्रेस, शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार

Akola : महायुतीत खोडा घालण्याचा प्रयत्न नक्की कोण करतंय? भाजप नेत्यानं स्पष्टच सांगितलं

PM Kisan Yojana: एका कुटुंबातील किती जण घेऊ शकतात पीएम किसानचा लाभ? कोणाला मिळणार ₹६०००? वाचा नियम

Pimple Free Skin: चेहरा पिंपल्सने भरलाय? 'या' 5 घरगुती टिप्सने लगेचच करा उपाय

SCROLL FOR NEXT