Weekly Horoscope saam tv
राशिभविष्य

Weekly Horoscope : पुढच्या आठवड्यात कोणत्या राशींचं नशीब चमकणार? पाहा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 5 To 11 May 2025: प्रत्येक दिवसाचं भविष्य हे ग्रहांनुसार बदलत असतं. यंदाच्या आठवड्यात तुमचं भविष्य कसं असणार आहे हे जाणून घ्या. कोणत्या राशींना सुख मिळणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

मेष

चतुर्थातील चंद्र-मंगळ युतीमुळे पूर्वार्धात घरातील वातावरण गरम राहील. वाहन जपून चालवावे. संततीच्या दृष्टीने चांगली घटना घडेल. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

वृषभ

धाडसी निर्णय घ्याल. पराक्रम, कर्तृत्वाची संधी मिळेल. शत्रूवर मात होईल. स्पर्धा, निवडणुकीत यश मिळेल. घर, वाहन खरेदी होईल. उत्तरार्धात संगीत, कला, मनोरंजनाचा आनंद घ्याल.

मिथुन

कुटुंबात कलह संभवतो. स्पष्टवक्तेपणामुळे वाद होतील. डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी. नातेवाइकांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. उत्तरार्धात घरात पाहुण्यांची वर्दळ वाढेल.

कर्क

राशीतील चंद्र-मंगळ युतीमुळे आक्रमक व्हाल. मानसिक स्वास्थ्य खराब राहील. उत्तरार्धात कौटुंबिक कामात यश मिळेल. सरकारी कामे होतील. तरुणांना नवीन नोकरीची संधी मिळेल.

सिंह

रस्त्यावरची भांडणे टाळावीत. कर्जाचा ताण राहील. किमती वस्तूंची काळजी घ्यावी. मात्र, आरोग्यात चांगली सुधारणा होईल. नोकरीत बढती प्रमोशन मिळेल. उत्तरार्धात पैशांची कामे होतील.

कन्या

वसुलीसाठी कटकटी होतील. मात्र शत्रूवर विजय मिळेल. स्पर्धा, निवडणुकीत यश मिळेल. मित्रांशी मतभेद संभवतात. उत्तरार्धात मोठा प्रवास होईल. लागेल. तरुणांचे विवाह जमतील.

तूळ

कामाचा झपाटा वाढेल. मोठी कामे मार्गी लागतील. धाडसी निर्णय घ्याल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार वाढेल. जोडीदाराचे प्रमोशन होईल. उत्तरार्धात मोठे खर्च होतील.

वृश्चिक

भाग्यातील चंद्र-मंगळ युती मोठी संधी निर्माण करणारी राहील. तरुणांना सरकारी नोकरीची संधी मिळेल. जुनी येणी वसूल होतील. मित्र-मैत्रिणींचा सहवास, सहकार्य मिळेल.

धनू

प्रवास जपून करावेत. पायाचे दुखणे संभवतात. घरातील वातावरण खराब राहील, मात्र उत्तरार्धात सरकारी कामे होतील. मोठा मानसन्मान मिळेल. नोकरी-व्यवसायात मनासारखे बदल होतील.

मकर

सप्ताहातील चंद्र-मंगळ युती जोडीदाराशी तणाव निर्माण करणारी राहील. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. उत्तरार्धात नोकरी, व्यवसायात प्रगती होईल.

कुंभ

हाताखालच्या लोकांकडून मनस्ताप संभवतो. बदली-बदल झाल्याने घरापासून दूर जावे लागेल. अचानक मोठे लाभ होतील. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी, पोटाचे विकार संभवतात.

मीन

पंचमातील चंद्र-मंगळ युती मुलांकडून मनस्ताप देणारी राहील. विद्यार्थ्यांना परीक्षा, प्रवेश यामधून कटकटी संभवतात. शेअर मार्केटपासून दूर राहावे. प्रेमप्रकरणात मतभेद संभवतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT