Horoscope saam tv
राशिभविष्य

Wednesday Horoscope : जोडीदाराची आरती ओवाळावी लागणार, गुप्तशत्रू वाढतील; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार नवं संकट

Wednesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात गुप्तशत्रू वाढण्याची शक्यता आहे. तर काहींना नव्या संकटांना सामोरे जावं लागणार आहे .

Anjali Potdar

आजचे पंचांग

मंगळवार,२४ जून २०२५,ज्येष्ठ कृष्णपक्ष.

तिथी-चतुर्दशी १९|००

रास-वृषभ २३|४६ नं. मिथुन

नक्षत्र-रोहिणी

योग-शूल ०९|३६

गंड ३०|००

करण-विष्टीकरण ०८|३४

शकुनी १९|००

दिनविशेष- चतुर्दशी वर्ज्य

मेष - भावंड सौख्य चांगले राहील. मात्र आपल्या वाणीवर आज नियंत्रण ठेवा. आपल्यामुळे जवळचे लोक दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. पर्यटनासाठी दिवस चांगला आहे.

वृषभ - नव्याने नाती जोडली जातील. मात्र जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्या. स्नेहभोजनाचे योग येतील. धनाची आवक जावक उत्तम राहील.

मिथुन - आपल्या बोलण्याने समोरच्याला आपलेसे कराल. नव्याने काही गोष्टी जिंकण्याची खूमखूमी आज राहील. आरोग्यासाठी दिवस उत्तम आहे.

कर्क - बंधनयोग, विनाकारण दवाखाने मागे लागणे, करत असलेल्या कामांमध्ये व्यत्यय येणे अशा गोष्टी आज आहेत. अमावस्येची विशेष आपल्या ऐवज आणि जिन्नस यांची काळजी घ्यावी. सावध रहा.

सिंह - भागीदारी व्यवसायामध्ये नव्याने काही गोष्टी लढवाल. कामाचा हुरुप वेगळाच राहील. जवळच्या लोकांबरोबर आनंदी क्षण उपभोगाल. आपण आजपर्यंत केलेल्या कामाविषयी कृतकृत्य भावना निर्माण होईल.

कन्या - चाणाक्ष असणारी आपली रास. करिअरच्या ठिकाणी विशेष मेहनत घ्याल. आपले वरिष्ठ आपल्या कामावर खुश असतील. बौद्धिक गोष्टीतून कामाशी निगडित मार्ग काढाल.

तूळ - आज अमावस्या आहे. विशेष लक्ष्मी उपासना आपल्या राशीला फलदायी ठरेल. भाग्यकारक घटना घडतील. प्रेमामध्ये यश लाभणार आहे. दिवस आनंदी असेल.

वृश्चिक - नको असलेल्या गोष्टी आज कराव्या लागतील. ठरवलेल्या गोष्टी तशा सुनियोजित पार पडणार नाहीत. मनावर दगड ठेवून काही निर्णय घ्यावे लागतील. पण उशिरा यात यश मिळेल.

धनु - जोडीदाराची आरती ओवाळावी लागेल. "सुसरबाई तुझीच पाठ माऊ" असा काहीसा दिवस आहे. सामंजस्याने कामकाज कराल. व्यवसायामध्ये भरभराट दिसते आहे.

मकर - जुनी दुखणे डोके वर काढतील. ठरवून काही गोष्टी होणार नाहीत. पण अडथळ्यातून मार्ग निघेल. गुप्तशत्रू वाढतील. दिवस संमिश्र आहे.

कुंभ - अमावस्या आहे. विशेष शिव उपासना आपल्याला फलदायी ठरेल. धनवृद्धीकारक दिवस दिसतो आहे. संततीची सुवार्ता कानी येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश लाभेल. संशोधक वृत्ती वाढेल.

मीन - घरी एखाद्या धार्मिक कार्य घडेल. पाहुण्यांची उठबस यामध्ये दिवस कसा गेला कळणार नाही. साधेपणाने समोरच्याची मने जिंकाल. शेतीवाडी मध्ये फायदा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Tea: थकवा घालवायचाय? रोज सकाळी प्या ब्लॅक टी, शरीराला मिळतील अनेक फायदे

Matheran Mini Train : पर्यटकांसाठी खुशखबर! नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ६ नोव्हेंबरपासून धावणार | VIDEO

Local Body Election : युती नकोच! राज ठाकरेंना काँग्रेसचा जोरदार धक्का, उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Local Body Election : नगराध्यक्ष कोण? निवडणुकीच्या घोषणेआधीच भाजपची ३-३ नावे, प्रदेशाध्यक्षांकडे यादी पोहचली

SCROLL FOR NEXT