Wednesday Horoscope in Marathi Saam tv
राशिभविष्य

Wednesday Horoscope : पार्टनरशी कडाक्याचं भांडण होणार, नात्यात दुरावा येण्याची शक्यता; 5 राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Wednesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांचं पार्टनरशी भांडण होईल. तर काहींच्या नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. वाचा बुधवारचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

बुधवार,१५ ऑक्टोबर २०२५,अश्विन कृष्णपक्ष.

तिथी-नवमी १०|३४

नक्षत्र-पुष्य

रास-कर्क

योग-साध्य

करण-गरज

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - "सुख आले दारी असा दिवस आहे" आपली मंगळाची असणारी रास. जमिनीचे व्यवहाराशी निगडित घनिष्ठ संबंध आहे. आज असे व्यवहार चांगले पार पडतील. वाहन आणि मातृसौख्य उत्तम.

वृषभ- बहिणीची विशेष माया आणि प्रेम काय आहे हे जाणवेल.कला, मनोरंजन क्षेत्रात चांगली भरारी माराल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. दिवस आनंदी आहे.

मिथुन - वडिलोपार्जित संपत्तीचे व्यवहार सुरळीत होतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या सहकार्याने पुढे जाल. घरातील वातावरण खेळीमेळीचे आणि आनंदी राहील.

कर्क - आजचा दिवस शुभ वार्ता घेऊन आलेला आहे. मनोवांछित गोष्टी घडतील. सुखाचा शोध... असा काहीसा दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. घरी पाहुण्यांची उठबस होईल.

सिंह - नव्या काही गोष्टींची खरेदी होईल.खर्च वाढता राहील . कोणाची तरी जबाबदारी उचलावी लागेल. दवाखाना, हॉस्पिटल अशा गोष्टी मागे लागतील. मानसिकता सांभाळा.

कन्या - मित्र-मैत्रिणींच्या सहवासामध्ये दिवस आनंदी राहील. प्रेमाला एक वेगळी झळाळी मिळेल. सून जावयांच्या स्नेहामुळे भारावून जाल. धन योगाला दिवस छान आहे.अनेक लाभ होतील.

तूळ - समाजाशी आपण काहीतरी देणे आहोत आहोत हे आज जाणवेल. एखाद्या चांगल्या उपक्रमात उत्साहाने सहभाग घ्याल. एखाद्या राजकारण्याने व्यक्तीशी घनिष्ठ संबंध येइल. दिवस संमिश्र आहे.

वृश्चिक - नातवंडांचे सुख लाभेल. चांगल्या वार्ता कानावर येतील. लांबचे प्रवास होतील. व्यवसायामध्ये मोठ्या काहीतरी घटना घडतील. भाग्यकारक असाच आज दिवस आहे. कुलस्वामिनीची उपासना करावी.

धनु - अपघाताचे योग आहेत.वाहने जपून चालवावीत. अचानक काही घटना घडतील ज्याला आज आपल्याला सामोरे जायला लागेल. कदाचित एखादी "टांगती तलवार" राहण्याची शक्यता आहे. सांभाळून राहा.

मकर - जोडीदाराशी अबोला संभवतो आहे. विनाकारण एखाद्या गोष्टीवरून खटका उडेल. पण व्यवसायिक क्षेत्रामध्ये घोडदौड होईल. नवनवीन संकल्पने भरलेला आजचा दिवस आहे.

कुंभ- एखादे संशोधनात्मक कार्य करण्यासाठी दिवस चांगल्या संधी घेऊन आलेला आहे. नाविन्याच्या शोधामध्ये आज राहाल. आपल्या हाताखाली लोकांच्याकडून योग्य ते सहकार्यामुळे मिळाल्यामुळे कामाला गती येईल.

मीन - दत्तगुरूंची उपासना आपल्याला चांगली ठरणार आहे. संततीच्या बाबतीत उत्तम बातम्या कानी येतील. कला, क्रीडा क्षेत्र, मनोरंजन क्षेत्रातील लोकांना दिवस सुखद जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT