

एनडीएनं बिहारमध्ये तब्बल 202 जागा जिंकल्या आणि विरोधकांचा सुफडा साफ केला... मात्र त्यामागे व्होटचोरी असल्याची शंका उपस्थित केली जातेय... मात्र व्होटशेरमधून वेगळीच माहिती समोर आलीय...
आरजेडीला 23 टक्के मतं आणि 25 जागा मिळाल्या. तर भाजपला केवळ 20.8 टक्के मतं मिळूनही 89 जागांवर विजय मिळाला... त्यामुळे कमी मतं मिळूनही भाजपला जास्त जागा कशा? असा प्रश्न निर्माण झालाय.. मात्र भाजपनं केवळ 101 जागा लढवल्या होत्या..तर आरजेडीनं 143... त्यामुळे भाजपनं आरजेडीइतक्या जागा लढवल्या असत्या तर मतांची टक्केवारी 29 पर्यंत पोहोचू शकली असती...
बिहार निवडणूकीत आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ही निवडणूक पक्षांनी नाही तर युती आणि आघाडीमध्ये लढली गेली...
त्यात एनडीएला 46 टक्के तर महागठबंधनला 38 टक्के मतं मिळाली आहेत.. या दोन्ही आघाड्यांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत 8 टक्क्यांचं अंतर आहे. खरं तर एनडीएला 2020 मध्ये केवळ 12 हजार जास्त मतं मिळाली होती . मात्र आता हा आकडा 44 लाखांवर पोहोचलाय...
खरंतर 2020 मध्ये चिराग पासवान आणि उपेंद्र कुशवाह स्वतंत्र लढले होते... आता चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला 5 तर कुशवाह यांच्या पक्षाला 1 टक्के मत मिळालंय. आता महागठबंधनची मतं कमी झालेली नाहीत तर एनडीएची मतं वाढली आहेत.. त्यामागचं कारण आहे महिलांना निवडणुकीआधी देण्यात आलेले दहा हजार... त्यामुळे बिहारमध्ये व्होटचोरी झाली नसल्याचा दावा करण्यात येतोय.. आता मुस्लीम आणि यादवांसोबतच इतर मतंही महागठबंधनकडे वळणार नाहीत तोपर्यंत महागठबंधनचं टेन्शन कायम राहणार असल्याचा दावा केला जातोय.. त्यामुळे खरंच व्होटचोरी झाली की दहा हजारांनी गेम फिरवला? हा प्रश्न कायम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.