Wednesday Horoscope in Marathi Saam tv
राशिभविष्य

Wednesday Horoscope : गुप्त शत्रूंचा त्रास वाढणार, पैशांबाबत घ्यावी लागणार काळजी; 5 राशींच्या लोकांनी जपून राहा

Wednesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना गुप्त शत्रूंचा त्रास होणार आहे. तर काहींना पैशांबाबत काळजी घ्यावी लागणार आहे. वाचा बुधवारचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

बुधवार,५ नोव्हेंबर २०२५,कार्तिक शुक्लपक्ष,त्रिपुरारी पौर्णिमा, गुरुनानक जयंती.

तिथी-पौर्णिमा १८|४९

रास- मेष

नक्षत्र-अश्विनी ०९|४०

भरणी ३०|३४

योग-सिद्धीयोग

करण-विष्टीकरण

दिनविशेष-भद्रा वर्ज्य

मेष - आज त्रिपुरी पौर्णिमा आहे. मनातील सर्व गोष्टी, कामना पूर्ण होण्यास चा आजचा दिवस तुमच्या राशीला चांगला आहे. जे संकल्प कराल ते सर्व सिद्धीस जातील मन प्रसन्न राहून भगवंताची उपासना सुद्धा आपल्याकडून होईल.

वृषभ - खर्चाला धरबंध नसेल त्यामुळे मनोबल कमी राहील. मात्र पौर्णिमेचा खास चंद्र उपासना मार्गातून आपल्या राशीला विशेष बल देणारी ठरेल. या मार्गातून प्रगती साधाल.

मिथुन - मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात दिवस कसा गेला करणार नाही. आपले परिचित आणि संबंधी लोकांच्यातून व्यवसायाच्या नव्याने वाटा फुलतील. धन योगाला दिवस उत्तम आहे.

कर्क - सामाजिक उपक्रमामध्ये हिरीरीने सहभाग घ्याल. कामाच्या ठिकाणी आपले कार्यक्षेत्र प्रभावी राहील. प्रवास होतील .पौर्णिमा आपल्या राशीला विशेष फलदायी आहे. केलेल्या कर्माचे उचित फळ आज मिळणार आहे.

सिंह - भाग्यकारक घटनांची नांदी आज होईल.काही गोष्टी जबाबदारीने तुमच्या खांद्यावर घेऊन पुढे जावे लागेल. पण एक वेगळा आत्मविश्वास घेऊन वावराल. त्रिपुरी पौर्णिमेचे खास तीर्थक्षेत्री दर्शन होईल.

कन्या - अडचणींचा सामना करून पुढे जावे लागेल. दिवस बौद्धिक गोष्टीमध्ये हिरीरीने सहभाग घ्याल. व्यवसायामधून उत्तम प्रकारचे धनयोग आज लाभणार आहेत. पौर्णिमा सार्थकी लागेल. अचानक पैसा मिळेल.

तूळ - जोडीदाराबरोबर हितगुजाच्या गोष्टी होतील. कौटुंबिक संवाद चांगला असल्यामुळे मनस्थिती ठीक राहील. व्यावसायिक जोडीदार यांबरोबर नव्याने बैठका होतील दिवस चांगला आहे.

वृश्चिक - गुप्त शत्रूंचा त्रास वाढला तरीसुद्धा परिस्थितीशी दोन हात कराल. दिवस खडतर असला तरी त्रिपुरी पौर्णिमा आपल्यासाठी जीवन जगण्यासाठी एक रेशमी दोर ठरणार आहे.

धनु - प्रेमामध्ये यश मिळेल. प्रणयामध्ये रंग चढतील, शेअर्समधील गुंतवणूक याचे भाव वधारतील. त्रिपुरी पौर्णिमेचे विशेष दत्त उपासना आपल्या राशीला आज फलदायी ठरणार आहे काही चांगल्या बातम्या कानी येतील.

मकर - घरामध्ये नव्याने काहीतरी खरेदी होईल. मन प्रसन्न राहील. घरातील मोठ्या लोकांच्या सल्ल्याने गेल्यास योग्य ती दिशा जीवनाला सापडेल. दिवस चांगला आहे. पौर्णिमा असल्याने नवीन घर, वाहन खरेदीसाठी दिवस योग्य.

कुंभ - भावंडांचे सौख्य मिळेल. प्रेमा मधून विशेष लाभ होतील. पत्रव्यवहार मार्गी लागतील. विशेष करून त्रिपुरी पौर्णिमा आपल्या राशीला फलदायी ठरणार आहे. नवीन हव्या असणाऱ्या जबाबदाऱ्या आज स्वीकाराल.

मीन - गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. घरी पाहुण्यांची ऊठबस होईल. त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त छोटासा धार्मिक कार्यक्रम घरी होईल. मनस्वास्थ चांगले असेल .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT