wednesday Horoscope  Saam tv
राशिभविष्य

Wednesday Horoscope : नवीन वर्षांत मालामाल व्हाल; ५ राशींच्या लोकांचा संपत्तीचा मार्ग मोकळा होणार

Wednesday Horoscope in Marathi : आज काही राशींचे लोक मालामाल होतील. तर काहींचा संपत्तीचा मार्ग मोकळा होईल. वाचा राशीभविष्य

Anjali Potdar

पंचांग

बुधवार,३१ डिसेंबर २०२५,पौष शुक्लपक्ष,भागवत एकादशी.

तिथी-द्वादशी २५|४८

रास-मेष ०९|२३ नं. वृषभ

नक्षत्र-कृत्तिका

योग-साध्य

करण-बवकरण

दिनविशेष-कृत्तिका वर्ज्य

मेष - जसे ठरवले असेल तशी दैनंदिन कामे आज मार्गी लागणार आहेत. मनोबल चांगले राहील. आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. स्वतःच्या धुंदीत मस्त रहाल.

वृषभ - काही ना आरोग्याच्या तक्रारीने दिवस व्यस्त राहील. महत्वाची कामे पुढे ढकललेली जास्त बरे राहिल. सरकारी कामांमध्ये व्यत्यय येईल. कलाकारांना विनाकारण कटकटी वाढतील.

मिथुन - महत्त्वाचे पत्रव्यवहार आज पार पडतील. प्रियजनांच्या सहवासाने दिवस आनंदी असेल. अनेक दिवस वाट पाहत असणारी एखादी घटना आज घडेल. दिवस चांगला आहे .

कर्क - सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. शासकीय कामे सुद्धा मार्गे लागतील. घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. अडचणीतून मार्ग काढत पुढे जाल. पदरी सन्मान प्राप्त होतील.

सिंह - रखडलेली कामे आज सहज मार्गी लावू शकाल. मनोबल उत्तम राहील. भगवंताची विशेष कृपा तुमच्यावर राहणार आहे.मोठे प्रवास घडतील.

कन्या - कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा न करता आज कामे करावीत . मानसिक अस्वस्थता जाणवेल. पण आयुष्य हा एकट्याचा प्रवास आहे हे समजून पुढे जाल तर दिवस बरा राहील.

तूळ - जोडीदाराचा सल्ला मान्य करावा लागेल.अर्थात हा लाभदायक सुद्धा ठरेल. तुमचा इतरांवर उत्तम प्रभाव राहील. नवीन गाठीभेटी, बैठका व्यवसायाशी निगडित आज होतील.

वृश्चिक - कर्मचारी वर्गाच्या सहकाऱ्याने पुढे जाल. आपल्या मार्गात कोणी आले तर काट्यासारखे उचलून फेकाल. हीत तशत्रूंवर मात करून पुढे जाल. दिवस "चोरावर मोर" होण्याचा आहे.

धनु - संततीचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. उपासनेने दिवस समृद्ध असेल. शेअर्स आणि लॉटरी इत्यादी ठिकाणी पैसा संभवतो आहे.

मकर - प्रॉपर्टी गुंतवणूक चे नवीन प्रस्ताव समोर येईल. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायामध्ये चांगली घोडदौड असेल. केलेल्या कामाला चांगले यश प्राप्त होईल.

कुंभ - काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्द आणि चिकाटीने यश खेचून आणाल. जवळचे प्रवास घडतील. शेजारील व्यक्तीचे योग्य ते सहकार्य मिळेल.

मीन - व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. योग्य ठिकाणी पैसे खर्च करणे आणि योग्य ठिकाणी वाचवणे आज ताळमेळ तुमच्या राशीला चांगला बसेल .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: गुंडाच्या परिवारावर अजितदादा मेहरबान; गुंडांच्या बायका निवडणुकांच्या मैदानात

BMC Election: ठाकरेंच्या मतदारसंघात असंतोषाचा भडका; निवडणुकीत पत्ता कट, नाराजांच्या कोलांट उड्या

Vande Bharat sleeper Train: जबरदस्त! वंदे भारत ट्रेनचा १८० किमीचा स्पीड, सुसाट वेगातही पाण्याचा ग्लास राहिला जशास तसा; Water Taste व्हिडिओ व्हायरल

RPI चा अपमान, रामदास आठवलेंचा संताप; नाराजीनंतर भाजपची धावाधाव, VIDEO

ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT