Manasvi Choudhary
हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे. रविवारी तुळशीला पाणी का घालू नये यामागचे कारण काय आहे.
रविवार हा भगवान विष्णूंचा अत्यंत प्रिय दिवस आहे. या दिवशी माता तुळशी भगवान विष्णूंसाठी 'निर्जला व्रत' करते.
जर आपण रविवारी तुळशीला पाणी घातले, तर तिचे व्रत भंग पावते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
रविवारी माता तुळशी विश्रांती घेते. तिला पाणी घालून किंवा तिची पाने तोडणे अशुभ मानले जाते.
रविवारी तुळशीला स्पर्श करणे, तिला पाणी घालणे किंवा तिची पाने तोडणे यामुळे 'विष्णू दोषा'चा सामना करावा लागू शकतो. असे केल्याने घरातील सुख-समृद्धी कमी होते
रविवारी तुळशीची पाने कधीही तोडू नयेत. पूजेसाठी पाने हवी असल्यास ती शनिवारीच तोडून ठेवावीत.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.