Wednesday Horoscope in Marathi Saam TV News
राशिभविष्य

Wednesday Horoscope : दिवसभरात आर्थिक चणचण भासणार, प्रेमामध्ये अपयश मिळणार; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

Wednesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे. तर काहींना प्रेमात अपयश मिळण्याची शक्यता आहे.

Anjali Potdar

आजचे पंचांग

बुधवार,१६ जुलै २०२५,आषाढ कृष्णपक्ष.

तिथी-षष्ठी २१|०२

रास-मीन

नक्षत्र-उत्तराभाद्रपदा

योग-शोभन

करण-गरज

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष -आपली मानसिकता जपावी लागेल. डोक्यावर बर्फ जिभेवर साखर ठेवा. विनाकारण चिडचिड ताण आज वगळून दिवस घालवावा लागेल. आर्थिक चणचण सुध्दा सहन करावी लागेल.

वृषभ - वाहनांशी निगडित आज विशेष काळजी घ्यावी लागेल. काही अडचणी किंवा त्रास या संदर्भात उद्भवू शकतात. जुन्या ओळखी नावाने ताज्या होतील. दिवस संमिश्र आहे.

मिथुन - प्रेमामध्ये अपयश मिळण्याचा संभाव आहे. कामाच्या ठिकाणी मात्र भरभराट दिसते आहे. ठरवाल ते करेनच असा "निश्चयाचा महामेरू" असणारा तुमचा आजचा दिवस आहे.

कर्क - प्रेमापोटी केलेली आणि जपलेली नाती असतात. आज त्यातील संबंध वृद्धिंगत होतील. आनंदाला भरती येईल. जीवन कृतकृत्य झाल्याची भावना जाणवेल. शिव उपासना विशेष फलदायी ठरेल.

सिंह - माहिती करूनच एखादा व्यवहार करावा. खूप मोठं मोठी आव्हाने आजच्या दिवसात घ्यायला नको. कदाचित सरकारी कामांमध्ये व्यत्यय येण्याचा संभव दिसतो आहे.

कन्या - बौद्धिक गोष्टीमध्ये आगेकुछ होईल. व्यापाराशी निगडित महत्त्वाचे निर्णय आज योग्य ठरतील. भागीदारीमध्ये एकमेकांना समजून घेऊन पुढे चला. दिवस चांगला आहे.

तुळ - थोड्या तब्येतीच्या तक्रारी आज दिसत आहेत. जुन्या गोष्टी विसरून आज चालणार नाही. कदाचित गुप्त शत्रू चाल करून येतील. श्रेयस आणि प्रेयस हे ठरवून मार्गक्रमण करावे लागेल.

वृश्चिक - कुलस्वामिनी उपासना आज फलदायी ठरेल. ठरवाल ते करूच असा ध्यास आज घेऊन जगाल. एकट्याने झगडावे लागले तरीही अपयशावर मात करून पुढे जाल. दिवस चांगला आहे.

धनु - मोठे प्रॉपर्टीशी निगडित व्यवहार घडतील. जुन्या नव्याचं मिलन होईल. घरातील मोठ्या व्यक्तीच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने प्रगती कराल. दिवस आशादायी आहे.

मकर - पराक्रमाला नवे पंख फुटतील. न बोलता अनेक कामे सहज करून जाल. कष्टाला मात्र आज पर्याय राहणार नाही. भावंडांशी अबोला संभवतो आहे.

कुंभ - धनाची आवक जावक चांगली राहील. गुंतवणुकीतून फायदा आहे. संशोधनात्मक कार्यात यश मिळेल. कुटुंबीयांशी संवाद साधू शकाल. स्वभावाला जरा वेगळे वळण लागेल.

मीन - माझे माझ्यातले असणे शोधण्यात आज दिवस व्यस्त राहील. सुखाच्या प्राप्तीसाठी धडपड कराल. सकारात्मक होऊन जगाल.आयुष्याला प्रभावी आकार येईल. दिवस सुंदर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांनी अडून धरला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा

Devendra Fadnavis : पोस्टमार्टम शिवाय जनावरांची नुकसान भरपाई मिळणार, देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांना दिलासा

'या' देशात घेऊ शकता कमी खर्चात शिक्षण; परदेशात शिकण्याचं स्वप्न करा पूर्ण

Navratri 2025 : गरबा खेळताना थकवा येणार नाही; फक्त 'या' ५ गोष्टी करा, एकदम फ्रेश वाटेल

पंतप्रधान मोदींचा 'तो' फोटो व्हायरल, काँग्रेस नेत्याला साडी नेसवली, डोंबिवलीत भाजप आक्रमक; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT