Shukra Gochar saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar: शुक्राच्या गोचरमुळे 'या' 3 राशींच्या तिजोरीत येणार पैसा, चांगली बातमीही मिळणार

Shukra Gochar 2025: धन, वैभव यांचा दाता शुक्र जूनमध्ये राशी बदलणार आहे. 3 राशीच्या लोकांना शुक्र ग्रहाची अपार कृपा मिळू शकणार आहे. यामुळे आर्थिक लाभ मिळू शकेल.

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येक राशींना काही खास ग्रहाकडून विशेष आशीर्वाद मिळतो. यावेळी धनाची देवता शुक्राचा विशेष आशीर्वाद मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. येत्या काळात म्हणजेच जून महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश झाल्याने धनदाता शुक्र काही राशींवर विशेष कृपा करणार आहे. शुक्र ग्रहाला पुन्हा राशीत प्रवेश करण्यास सुमारे १३ महिने लागणार आहे.

द्रिक पंचांगानुसार शुक्र रविवारी 29 जून रोजी दुपारी 02 वाजून 17 मिनिटांनी वृषभ राशीत भ्रमण करणार आहे. यावेळी काही राशींना चांगलं फळ मिळणार आहे, तर काही राशींना यावेळी करियरमध्ये उत्तम संधी मिळणार आहे. यामध्ये कोणत्या राशींना समावेश आहे ते पाहूयात.

वृषभ रास

वृषभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात. शुक्राच्या कृपेने सुखसोयींचा लाभ घेऊ शकणार आहात. नातेसंबंध पूर्वीपेक्षा चांगले आणि मजबूत होणार आहेत. मित्रांसोबतचे संबंध सुधारू शकतात. कौटुंबिक सुखामध्ये वाढ होईल. धार्मिक कार्य करण्याकडे कल राहील.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचा राशी परिवर्तन शुभ परिणामांसह होणार आहे. नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ होऊ शकणार आहेत. घरात सुख-शांतीचे वातावरण राहणार आहे. प्रेमाशी संबंधित लाभ होऊ शकतात. व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहणार आहे.

मकर रास

मकर राशीसाठी शुक्राचा प्रवेश करणे शुभ राहणार आहे. आर्थिक परिस्थिती वाढू शकणार आहे. कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत असू शकतो. व्यापाऱ्यांसाठी हा काळ चांगला असू शकतो. करिअरमध्ये यश मिळवू शकाल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणचा नवा 14 कलमी शांतता प्रस्ताव; युद्धविराम प्रस्तावावर चर्चा होणार की तणाव वाढणार?

नसरापूर घटनेचा SIT करणार तपास; नराधमाला फाशी द्या, नागरिकांची मागणी

Nagpur Heatstroke: महाराष्ट्रात उष्णतेची जीवघेणी लाट, नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू?

Maharashtra News Live Update: राजूर घाटात भीषण वनवा; अजिंठा पर्वतरांगेतील जंगलाला आग

8th Pay Commission: ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, नवीन वेतनश्रेणी कधी लागू होणार? मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT