Vipareet Rajyog saam tv
राशिभविष्य

Vipreet Rajyog 2026: शुक्राच्या गोचरमुळे तयार होणार विपरीत राजयोग; 14 मे पर्यंत या राशींवर बरसणार पैसा

Venus transit 2026: शुक्राचा वृषभ राशीत गोचर होऊन विपरीत राजयोग तयार झाला आहे. या योगामुळे काही राशींना अचानक आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहस्थितीतील बदलांचा परिणाम सर्व राशींवर होत असतो. सध्या शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करत असून तो १४ मे २०२६ पर्यंत याच राशीत राहणार आहे. शुक्राच्या या गोचरामुळे वृषभ राशीत एक विशेष आणि दुर्मिळ योग निर्माण झालाय. याल विपरीत योग म्हटलं जातं.

ज्योतिषशास्त्रानुसार विपरीत राजयोग हा एक अत्यंत अद्वितीय, फायदेशीर आणि शुभ योग मानला जातो. ज्योतिषांच्या मते, हा योग काही राशींसाठी अनपेक्षित लाभ आणि प्रगतीच्या संधी घेऊन येणार आहे. विशेषतः तीन राशींसाठी हा योग अधिक चांगला असणार आहे.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींना या काळात महत्त्वपूर्ण आर्थिक संधी मिळू शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जीवनात सुखसोयी आणि ऐषारामात वाढ होऊ शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. बऱ्याच काळापासून अडकलेला निधी परत मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा व्यवसायात वाढीसाठी शुभ संधी निर्माण होतो. कुटुंबातील चालू असलेले मतभेद मिटून वातावरण सुधारण्याची शक्यता आहे.

धनु

हा काळ तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो. तुमच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. कठीण परिस्थितीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. परदेशातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Update : विजांसह मुसळधार पाऊस, कोकणासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: कर्ज आणि मुलीच्या उपचाराच्या चिंतेने शेतकऱ्याने संपवलं जीवन

BJP MLA Accident: भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात, गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेलं; अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO

Sunday Horoscope: नशीब चमकणार! या 3 राशींना मिळणार मोठी संधी; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : दुसरी स्त्री आवडूनही पुरुष तिच्याशी नात्याची कमिटमेंट का करत नाहीत? ‘ही’ 5 कारणं

SCROLL FOR NEXT