Conjunction Of Saturn And Venus saam tv
राशिभविष्य

Shukra-shani Yuti: 30 वर्षांनंतर होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या दारी येईल लक्ष्मी, मिळेल बक्कळ पैसा

Conjunction Of Saturn And Venus 2024: डिसेंबरच्या अखेरीस शुक्राचा शनीशी संयोग होणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींना लाभ होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी दैत्य गुरु शुक्र ग्रह दर २६ दिवसांनी त्याच्या राशीत बदल करतो. या ग्रहाच्या राशी परिवर्तनाने त्याचा इतर ग्रहाशी देखील संयोग होतो. डिसेंबरच्या अखेरीस शुक्राचा शनीशी संयोग होणार आहे.

डिसेंबरच्या शेवटी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार असून त्या ठिकाणी शनी ग्रह आधीच उपस्थित आहे. यामुळे शुक्र आणि शनीचा संयोग कुंभ राशीत होणार आहे. या दोन शक्तिशाली ग्रहांच्या संयोगामुळे अनेक राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींना लाभ होणार आहे.

कधी होणार शुक्र शनीची युती?

शुक्र 28 डिसेंबर रोजी रात्री 11:48 वाजता कुंभ राशीत प्रवेश करेल. ज्या ठिकाणी शनी ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत 30 वर्षांनंतर कुंभ राशीमध्ये शनी आणि शुक्राचा संयोग होईल.

मेष रास

शुक्र आणि शनीचा संयोग या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला भरपूर आर्थिक लाभही होऊ शकतो. तुम्हाला एकापेक्षा जास्त व्यवसाय करण्याची संधी आहे. दीर्घकाळ रखडलेल्या इच्छा आता पूर्ण होणार आहेत.

वृषभ रास

या राशीमध्ये शुक्र आणि शनीचा दशम भावात संयोग होणार आहे. या काळात तुमची रखडलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. व्यवसायामध्ये तुमची चांगली प्रगती होणार आहे. व्यावसायिकांना मोठा पैसा मिळू शकणार आहे. मित्र किंवा कुटुंबासह बाहेर फिरायला जाऊ शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहणार आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीचा संयोग देखील खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. बेरोजगारांनाही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शक्यता आहे. अभ्यासासाठी परदेशात जाण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : नवी मुंबईत खळबळ; महापालिका मुख्यालयातच उपायुक्ताला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

NalaSopara Tourism : 'नालासोपारा'जवळील ५ विरंगुळ्याची ठिकाणे, वीकेंडला करा लहान मुलांसोबत धमाल

'तुझी फिगर झिरो, गुढी पाडव्याला साडी खेचली, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य, TCS धर्मांतर प्रकरणातील पीडितेचा हादरवणारा जबाब

Maharashtra News Live Update: धुळे मनपा आयुक्तांचा आक्रमक पवित्रा, कर्तव्यात कसूर करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांचं निलंबन

Summer AC Settings: उन्हाळ्यात AC कितीवर ठेवला पाहिजे? लाईटबिल होईल अर्ध

SCROLL FOR NEXT