Venus Transit saam tv
राशिभविष्य

Venus Retrograde: शुक्राच्या वक्री चालीमुळे ४३ दिवस 'या' राशींसाठी कठीण! नात्यांमध्ये तणाव, आर्थिक चणचण जाणवणार

Venus retrograde effects on zodiac signs: शुक्र हा आकर्षण, प्रेम, सौंदर्य, भव्यता, विलास यांचा कारक मानला जातो. ज्यावेळी शुक्राची स्थिती बदलते तेव्हा जीवनाच्या या सर्व पैलूंवर आणि क्षेत्रांवर त्याचा खोल परिणाम होतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र हा एक अत्यंत महत्त्वाचा ग्रह असून एखाद्या व्यक्तींच्या जीवनात सुख, शांती तसंच समृद्धी आणण्यास मदत करतो. शुक्र हा आकर्षण, प्रेम, सौंदर्य, भव्यता, विलास यांचा कारक मानला जातो. ज्यावेळी शुक्राची स्थिती बदलते तेव्हा जीवनाच्या या सर्व पैलूंवर आणि क्षेत्रांवर त्याचा खोल परिणाम होतो.

वर्ष 2025 मध्ये सुख आणि समृद्धी देणारा शुक्र 43 दिवस वक्री भ्रमण करणार आहे. शुक्राची वक्री चाल ज्योतिषशास्त्रात चांगली मानली जात नाही. वैदिक ज्योतिष्या शास्त्रानुसार, शुक्र ग्रह रविवारी 2 मार्च 2025 रोजी सकाळी 6:04 पासून वक्री फिरणार आहे. शुक्राची ही वक्री अवस्था एकूण 43 दिवस चालणार आहे.

शुक्र 2 मार्च ते 13 एप्रिल पर्यंत वक्री होणार असून तो एकूण 43 दिवसांचा कालावधी आहे. शुक्राची वक्री चाल सर्व राशींवर परिणाम करणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना या काळात अधिक आव्हानांना सामोरं जावं लागतं. काहींची आर्थिक हानी होईल तर काहींना नातेसंबंधांमध्ये तणाव वाटू शकतो. पाहूयात यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

मेष रास

अनियोजित खर्चात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या पैशांची शहाणपणाने गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी अडचणी वाढू शकतात. अपेक्षित परिणाम न मिळाल्याने तणाव राहण्याची शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात विलंब होऊ शकतो. ज्यामुळे करिअरच्या वाढीवर परिणाम होणार आहे.

कर्क रास

जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्यांशी मतभेद आणि भांडणं होऊ शकतात. नात्यात अविश्वास आणि संशय वाढण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधांमध्ये अंतर आणि संवादाचा अभाव असू शकतो. डोकेदुखी, मायग्रेन हे त्रास पुन्हा उद्भवू शकतात. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ रास

जोडीदार, मित्र आणि कुटुंबापासून भावनिक अंतर वाढू शकणार आहे. सामाजिक जीवनात तुम्हाला एकटेपणा आणि दुःखी वाटू शकते. खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष न दिल्यास पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि संवाद ठेवणं गरजेचं आहे.

तूळ रास

उत्पन्नाच्या स्त्रोतांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. चुकीच्या गुंतवणुकीमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कर्ज घेणं तुम्ही टाळलं पाहिजे. कामाच्या ठिकाणी काम पूर्ण करण्यात अडचण येऊ शकते. पैसे वाचवा आणि सध्या मोठी गुंतवणूक टाळा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO EDLI Scheme: तुमचं PF अकाउंट आहे? तुम्हाला मिळतो ७ लाखांचा मोफत विमा; कसं? वाचा सविस्तर

मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस, हजर होण्याचे आदेश, नेमकं कारण काय? VIDEO

Onkar Elephant : नदीत अंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर अमानुष हल्ला, अंगावर सुतळी बॉम्ब फेकले अन्...

Actress Journey: योगा टीचरवर पडली डायरेक्टरची नजर, केलं फिल्ममध्ये कास्ट; आज आहे कोट्यवधीची मालकीण

मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी मोठी अपडेट; आरोपीचा महत्वाचा व्हिडिओ समोर, कोण अडकणार?

SCROLL FOR NEXT