Basant Panchami saam tv
राशिभविष्य

Basant Panchami: वसंत पंचमीला शुक्र-शुक्र आणि नेपच्युन बनवणार पॉवरफुल योग; 2 फ्रेबुवारीपासून 'या' राशींच्या घरी येणार पैसे

Basant Panchami 2025 Horoscope: सूर्य-वरूण अर्धकेंद्र योग तयार करत असून यावेळी शुक्र-वरूण योग तयार करत आहेत. त्याचप्रमाणे शिव आणि सिद्धीसोबत सर्वार्थ सिद्धी योग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू धर्मामध्ये वसंत पचंमीला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी बसंत पंचमी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा करण्यात येतो. या दिवशी देवी सरस्वतीची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे. यावर्षी 2 फेब्रुवारी 2025 रोजी बसंत पंचमी साजरी होणार आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी खास बाब म्हणजे यावेळी खास योग देखील तयार होतायत.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी शनि पूर्वाभाद्रपदाच्या द्वितीय स्थानात प्रवेश करणार आहे. याशिवाय सूर्य-वरूण अर्धकेंद्र योग तयार करत असून यावेळी शुक्र-नेपच्यून युती योग तयार करत आहेत. त्याचप्रमाणे शिव आणि सिद्धीसोबत सर्वार्थ सिद्धी योग तयार होणार आहे. असा दुर्मिळ संयोग एकत्र निर्माण झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना शनी आणि सूर्याची विशेष कृपा मिळणार आहे. यावेळी काही राशींच्या लोकांना या काळात अधिक लाभ मिळणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात

वृषभ रास

वसंत पंचमीला तयार होणारा दुर्मिळ योग वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश मिळू शकणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकणार आहेत. या राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळचा ताण कमी होऊ शकतो.

मकर रास

सूर्य मकर राशीत असून या राशीच्या लोकांवर शुक्र आणि शनीची अपार कृपा राहणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांच्या सुखसोयींमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या संपण्याची शक्यता आहे. आज तुम्ही कामात मेहनत घेत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणाबाबत पालकांच्या अडचणी कमी होऊ शकतात.

कर्क रास

या राशीच्या लोकांनाही खूप फायदा होणार असून तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा येणार आहे. तुम्हाला जवळच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे. तुम्ही तुमच्या कामासाठी प्रामाणिक असाल. जीवनात आनंदाची खेळी होईल. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT