horoscope  Saam tv
राशिभविष्य

Tuesday Horoscope : नागदेवतेची कृपा होणार; अचानक धनयोग येणार; ५ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार फलदायी

Tuesday Horoscope in Marathi : आज नागपंचमीच्या दिवशी काही राशींच्या लोकांवर नागदेवतेची कृपा होणार आहे. तर काहींसाठी जीवनात अचानक धनयोग येणार आहे.

Anjali Potdar

आजचे पंचांग

मंगळवार,२९ जुलै २०२५,श्रावण शुक्लपक्ष,

नागपंचमी.

तिथी-पंचमी २४|४७

रास-कन्या

नक्षत्र-उत्तरा

योग-शिव

करण-बवकरण

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - उष्णतेचे विकार आणि पोटाच्या तक्रारीने आज दिवस त्रस्त राहील. तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आपले महत्त्वाचे ऐवज आणि जिन्नस याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.दिवस बरा आहे.

वृषभ - आज नागपंचमी. हिंदूंचा महत्त्वाचा सण. आजच्या दिवशी विशेष शिवउपासना, नाग उपासना करणं फलदायी ठरेल. पैशामधील गुंतवणूक अचानक धनयोग निर्माण करून देईल. दिवस चांगला आहे.

मिथुन - करिअरच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय आणि बैठका आज पार पडतील. जवळच्या लोकांच्या सहकार्याने मोठी भरारी घ्याल. शेतीवाडी चे निर्णय मार्गी लागतील.

कर्क - भाग्याला पुष्टी देणारा आजचा दिवस आहे. जे कराल ते ठरवून कराल आणि यश खेचून आणाल. भावनिक गुंतवणूक अति चांगली नाही की ज्यामुळे आपण मागे पडू याची काळजी घ्या. जवळचे प्रवास घडतील.

सिंह - आपले महत्त्व कुटुंबीयांना जाणवेल. आपल्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा येतील आणि त्या तुम्ही योग्यरीत्या पार पाडाल. आपले पद बाळगून राहणार आहात. दिवस चांगला आहे.

कन्या - मनाने आनंदी असणार आहात. नवनवीन संकल्पने भरलेला दिवस आहे. इतरांना बरोबर घेऊन जाल. बौद्धिकदृष्ट्या प्रगतीची वाटचाल आहे.

तूळ - जोडीदाराच्या तब्येतीसाठी खर्च करावा लागेल. टाळू म्हणून खर्च टळणार नाहीत. पैशाचे योग्य नियोजन आज करणे गरजेचे आहे. हातबलता निर्माण होईल.

वृश्चिक- जोडीदाराच्या प्रगतीसाठी प्रयत्न कराल. कलात्मक गोष्टी नवनवीन संकल्पना, बहरणार आहेत. जुन्या ओळखी आणि परिचयामधून फायदा होईल.

धनु - कामामध्ये एक प्रकारची सुसूत्रता येईल. नियोजित बैठका योग्य रीतीने पार पडतील. सामाजिक क्षेत्रात आघाडीवर राहाल. दिवस चांगला आहे.

मकर - आज नागपंचमी शिव उपासना महत्वाची आणि फलदायी ठरणार आहे. मनापासून केलेल्या गोष्टींचे संकल्प आज सिद्धीस जातील. चांगल्या वार्ता कानी येतील. दिवस प्रसन्न आहे.

कुंभ- केलेल्या कष्टाचे चीज होईल. मात्र लगेचच फळ नाही मिळणार. धनासाठी करण्यात येणारी खटपट आज दुपारनंतरच केलेली बरी. सरकारी कामात अडचणी येतील.

मीन - नवीन दिशा, नवीन आशा घेऊन कामाला लागाल. संकल्प पूर्तीचा दिवस आहे. मोठ्या कामाशी निगडित मोठे निर्णय आज होतील. वरिष्ठांकडून विशेष सहकार्य मिळेल. दिवस संमिश्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT