Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Tuesday Horoscope : मनासारख्या गोष्टी घडतील; ५ राशींच्या लोकांचे भाग्य फुलून येईल

Tuesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांच्या मनासारख्या गोष्टी घडतील. तर काही राशींचे भाग्य फुलून येईल.

Anjali Potdar

पंचांग

मंगळवार,२५ नोव्हेंबर २०२५, मार्गशीर्ष शुक्लपक्ष,नागपूजन-नागदिवे.

तिथी-पंचमी २२|५८

रास-मकर

नक्षत्र-उत्तराषाढा

योग-गंडयोग

करण-बवकरण

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - आजचा दिवस शुभ दिवस आहे. नागदिवे पूजनाचा दिन. आपल्या राशीला अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत. करिअरच्या ठिकाणी बढतीचे योग आहेत. प्रवासातून फायदा होईल.

वृषभ - काहीतरी चांगली बातमी ज्याची अनेक दिवसात आपण प्रतीक्षेत होता अशी आज आपल्या कानावर येईल. तीर्थक्षेत्री भेटी होतील. मात्र दानधर्म, दानत चांगली ठेवलीत तर भाग्य फुलून येईल.

मिथुन - जोपर्यंत आपल्याला मान आहे एखादे पद आहे तोपर्यंत आपल्या जवळपास लोक येतात. काही वेळेला पाठ फिरवल्यासारखे लोकांचे वागणं असते. आज याची अनुभूती तुम्हाला येईल. विशेषत्वाने कोणाच्या सहकार्याची अपेक्षा न करता तुम्हाला कामे करावी लागतील.

कर्क - कष्टाला पर्याय नाही असे काही दिवस असतात. आज धावपळ दमणूक होईल.पण कामाच्या ठिकाणी मनासारख्या गोष्टी घडतील. विशेष काही योजना व्यवसायाच्या ठिकाणी आखाल आणि त्याला नक्की यश मिळेल.

सिंह - पाठीची दुखणे असतील. तर आज त्याचा त्रास अधिक संभवतो आहे. हृदयाची काळजी घ्या. मामा, मावशीच्या प्रेमामुळे एक भावनिक ओलावा जाणवेल. दिवस संमिश्र आहे. शत्रूवर मात करून पुढे जाल.

कन्या - आज नागदिवे पूजनाचा दिवस आहे. शुभ गोष्टी करायला उत्तम फलिते आपल्या राशीला मिळणार आहेत. शेअर्स निगडित व्यवहार करायला आज हरकत नाही. जवळच्या लोकांच्या प्रेमाचे वर्षावावे मन भारावलेले असेल.

तूळ - प्रपंच करताना काय गोष्टी लागत नाहीत. सगळ्याचा हव्यास आवडणे आपल्या राशीला आहेच. आज घरासाठी नवीन खरेदी कराल. वाहन सौख्य सुद्धा उत्तम आहे.

वृश्चिक- भावंडांचा विशेष आधारा आज आपल्याला वाटेल. रेंगाळलेले पत्रव्यवहार होतील. जवळचे प्रवास घडतील काहीतरी नवी ऊर्जा आणि जिद्द घेऊन आज कामे कराल.दिवस चांगला आहे.

धनु - काही गोष्टींचे निर्णय घेताना आपली रास द्विधा मनस्थिती असते. आज या गोष्टी टाळा. सहज सोप्या गोष्टी अवघड करण्यापेक्षा योग्य व्यक्तीच्या सल्ल्याने पुढे जा. धनाची आवक जावक सुद्धा चांगली राहील. दिवस चांगला आहे.

मकर - तशी अबोल आणि साधी असणारी आपली रास आहे. पैशाची निगडित हात आखडता घेता पण आज मनसोक्त जगावे असे वाटेल. स्वतःसाठी चार चांगल्या गोष्टी आज तुम्ही नक्की करणार आहात. आपली सकारात्मकता वाढेल.

कुंभ - आपल्या राशीला संशोधनात्मक कार्यामध्ये विशेष रस आहे. याचा पाठपुरावा कराल. भले वाटेत अडचणी आल्या तरी त्या काट्यासारख्या दूरही कराल. आपल्याच लोकांपासून त्रास होतील. पण मनस्वास्थ्य ठीक ठेवून पुढे जावे.

मीन - मित्र-मैत्रिणींचे आयुष्यामध्ये एक वेगळी आणि हक्काची जागा आपल्या राशीने इतरांना दिली आहे.आज यांच्याकडून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव होईल. मन भारावलेले असेल. अनेक लाभ होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : आता पाईपलाईननं दारू मिळणार? सरकारकडे अर्ज केल्यानंतर कनेक्शन?

Smriti Mandhana: स्मृती मानधना-पलाशचं लग्न का पुढे ढकललं? कधी होणार लगीन? मुच्छलच्या बहिणीचा मोठा खुलासा

बिबट्या आला रे...! आधी गावात दहशत, आता पुणे शहरात एन्ट्री, VIDEO

धनंजय मुंडेंना 'कराड'ची ओढ? कराडच्या आठवणीनं मुंडे व्याकूळ, VIDEO

Ethiopia volcano : इथियोपियात १०००० वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक; आकाशात १०-१५ किमी उंच उडाले राखेचे कण, भारतावर संकट?

SCROLL FOR NEXT