Horoscope  Saam tv
राशिभविष्य

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

Tuesday Horoscope in Marathi : काही राशींच्या खर्चाची गळतीच राहील. काही लोकांना चोरट्यांपासून सावध राहावे लागेल.

Anjali Potdar

पंचांग

मंगळवार,१६ डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष कृष्णपक्ष,धनुर्मासारंभ.

तिथी-द्वितीया २३|५८

रास-तुला

नक्षत्र-स्वाती

योग-अतिगंड

करण-कौलव

दिनविशेष-१४ प.चांगला

मेष - काळजी करून कोणत्याही गोष्टी होत नाहीत. उलट तिढा वाढत जातो. आज आपल्या जोडीदाराचा सल्ला विचारात घेतल्यास मार्ग सुकर होतील. व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

वृषभ - अनेक ठिकाणी कष्ट मेहनत करून मिळालेला पैसा किंवा जिन्नस ऐवज याची आज काळजी घेणे गरजेचे आहे. कोणीतरी जवळची व्यक्ती किंवा नोकर, चाकर यांच्यापासून यासाठी धोका दिसतो आहे. चोरीपासून सावध राहा.

मिथुन - विष्णू उपासनाने दिवसाची सुरुवात करा दिवस अतिशय उत्तम जाईल. उपासना मार्गामध्ये आपला आलेख उंचावेल. जवळच्या लोकांकडून योग्य सहकार्य मिळेल. शेअर्समध्ये फायदा होईल.

कर्क - घरी पाहुण्यांचे आगमन होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि सुखदायक राहील. नव्याने काही गोष्टींची खरेदी होईल. सुखकारक असा दिवस आहे.

सिंह - प्रेमामधून लाभ होतील. न ठरवता काही गोष्टी सहज होणार आहेत. आपला आत्मविश्वास अगदी शिगेला पोहोचेल. धाडसाने आणि धडाडीने नवीन काम करण्यासाठी निधड्या छातीने पुढे जाल.

कन्या - केलेल्या कामाची पावती आज मिळेल. पैशाचे चलन वलन चांगले राहील. जोडीदाराच्या तब्येतीची मात्र काळजी घ्यावी लागेल. कुठेही साक्षीदार आज राहू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या.

तुळ - मनामध्ये असलेल्या गोष्टी अस्तित्वात उतरण्यासाठी प्रयत्न कराल. आपला इतरांवर प्रभाव राहील. आपले व्यक्तिमत्व उजळून येईल. दिवस आनंदी आणि आशादायी आहे.

वृश्चिक - मनस्थिती खराब होण्यासाठी अनेक वाटा येतील. मात्र आपल्याला खंबीर राहायचे आहे हे लक्षात ठेवा. खर्चाला गळतीच राहील. अध्यात्माची कास धरल्यास दिवस बरा जाऊ शकतो.

धनु - प्रेम केले आहे तर ते निभावावे लागेल. जोडीदाराबरोबर कदाचित किरकोळ वादविवाद होतील. पण प्रेम अबाधित राहील. समजून घेऊन कामे केल्यास दिवस चांगला राहील.नात्यातील लाभ मिळतील.

मकर - सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेऊन कामे कराल. इतरांसाठी आपण केलेल्या कामाचे आज योग्य ते फळ मिळणार आहे. वरिष्ठाकडून आपले विशेष कौतुक होईल. दिवस चांगला आहे.

कुंभ - अडचणींवर मात करून पुढे जायला पाहिजे असा काही दिवस नाही. सहज आणि विनासायास यश आपल्याला मिळेल. जे घडणार आहे त्याकडे सजगतेने बघणे गरजेचे आहे. शिव उपासना फलदायी ठरेल.

मीन - अचानक घबाड मिळाले कि काय! इतका पैसा आज आपल्या नशिबामध्ये आहे. पण तो वाम मार्गाने येणार नसावा हे लक्षात ठेवून कामे करावीत. कष्टाला पर्याय नाही हे समजून जाणे आणि काम करणे आज गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT