horoscope  Saam tv
राशिभविष्य

Tuesday Horoscope : लाडका गणपती भक्तांवर प्रसन्न होणार; वृषभसह ५ राशींच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Tuesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांवर गणपती प्रसन्न होणार आहे. तर काही लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार आहेत.

Anjali Potdar

आजचे पंचांग

मंगळवार,२ सप्टेंबर २०२५,भाद्रपद शुक्लपक्ष,गौरी विसर्जन.

तिथी-दशमी २७|५३

रास- धनु

नक्षत्र-मूळ

योग-प्रीतियोग

करण-तैतिल

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - गणेश उपासना विशेष फलदायी ठरेल. दैनंदिन कामे सुकर मार्गी लागणार आहेत. मोठ्या प्रवासाचे आयोजन, नियोजन करत असाल तर आज त्यामध्ये यश आहे.

वृषभ - विनाकारण मतभेद,वाद कोणाशीही टाळावेत. हाती घेतलेला कामांमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. कामे रखडतील. दुपारनंतर केलेली जास्त फायद्याचे ठरेल.

मिथुन - भागीदारी व्यवसायामध्ये सुयश लाभणार आहे. मानसिक स्वास्थ आणि समाधानामुळे कामावर विशेषत्वाने फोकस कराल. दिवस चांगला आहे.

कर्क - हितशत्रूंचा त्रास संभवतो आहे. वेळ आणि पैसा मात्र वाया जाण्याची दाट शक्यता आहे.मानसिक आजार आणि कटकटी आज वाढतील.

सिंह - आज वैचारिक परिवर्तनाचा दिवस आहे. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरणार आहेत. आपली सृजनशीलता वाढेल. रवी उपासना आज फलदायी ठरेल.

कन्या - प्रॉपर्टीशी निगडित व्यवहार होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. घरामधील छोट्याशा कार्यामध्ये सहभागी व्हाल. आनंदी दिवस आहे.

तूळ - नोकरी व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहणार आहे. भाग्यकारक घटना घडतील. आरोग्यदायक स्थिती राहील.नवीन काही संकल्प आणि प्रतिज्ञा आज घेतल्यास यश आहे.

वृश्चिक - कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधला जाईल. आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. काही विशेष पराक्रम आपल्या हातून होतील. हिशोबांचा लेखाजोखा आज ठेवावा लागेल.

धनू - आपल्या मतांविषयी आज आग्रही राहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात नव्याने संधी, प्रसिद्धी सुद्धा लाभेल. दिवस काही चांगल्या गोष्टी घेऊन आलेला आहे.

मकर - आपले महत्त्वाचे ऐवज, जिन्नस सांभाळणे आज गरजेचे आहे. वस्तू गहाळ नाही ना याची दक्षता घ्यावी. विनाकारण खर्चाचे प्रमाण वाढते राहील.

कुंभ - मित्र-मैत्रिणींच्या सहवासाने दिवस आनंदाचा असेल. हाती घेतलेल्या सर्वच कामांमध्ये आज सुयश लाभणार आहे. काळजी नसावी.

मीन - तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मानसन्मान प्रतिष्ठा लाभेल. केलेल्या कामाविषयी तुमचा आत्मविश्वास वाढेल. जवळच्या लोकांच्या सहकार्याने प्रगतीपथावर रहाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karwa Chauth 2025: करवा चौथ कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त अन् पद्धत

Gauri Kulkarni: जशी नभीची चमचम चमके चांदणी, गौरी कुलकर्णीचा सुंदर साज

Nilesh Ghaiwal : फरार गुंड निलेश घायवळला पुणे पोलिसांचा दणका, आता बायको अन् मुलगाही अडचणीत, कारवाईची टांगती तलवार कायम

Kalyan : कचऱ्यात पडलेले गुलाबजामुन खाण्याचा मोह; मुलीची प्रकृती बिघडली, कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना

POK Erupts After Nepal: नेपाळनंतर POK पेटलं, जनतेचं बंड, मुल्ला मुनीरची घाबरगुंडी

SCROLL FOR NEXT