Panchang Today Saam Tv
राशिभविष्य

Panchang Today: आजचं पंचांग व राशीयोग; कृष्ण एकादशी कोणाच्या राशींसाठी ठरणार लकी डे?

Krishna Ekadashi lucky zodiac signs: आजचा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून विशेष आहे कारण आज कृष्ण एकादशी आहे. हिंदू धर्मात एकादशीला उपवास, जप आणि ध्यान करण्याचे महत्त्व आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज १३ जानेवारी २०२६ असून हेमंत ऋतूतील हा मंगळवार संयम, श्रद्धा आणि आत्मचिंतनासाठी योग्य मानला जातो. कृष्ण एकादशी तिथी असल्याने धार्मिक, आध्यात्मिक आणि संयम राखणाऱ्या कामांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. चंद्र तूळ राशीत असल्यामुळे आज व्यवहारात समतोल, नातेसंबंधात समजूतदारपणा आणि निर्णय घेताना शांत डोक्याने विचार करण्याची गरज भासेल.

आजचं पंचांग

  • तिथि – कृष्ण एकादशी

  • नक्षत्र – विशाखा

  • करण – बव

  • पक्ष – कृष्ण पक्ष

  • योग – शूल (सायं. 06:53:28 पर्यंत)

  • दिन – मंगळवार

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – 06:53:24 AM

  • सूर्यास्त – 05:32:29 PM

  • चंद्र उदय – 02:11:27 AM

  • चंद्रास्त – 12:57:54 PM

  • चंद्र राशि – तुला

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह (अमान्ता) – पौष

  • माह (पूर्णिमान्ता) – माघ

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 02:52:42 PM ते 04:12:36 PM

यमघंट काल – 09:33:11 AM ते 10:53:03 AM

गुलिकाल – 12:12:56 PM ते 01:32:49 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:51:00 AM ते 12:33:00 PM

आजच्या चार शुभ राशी

तूळ रास

चंद्र तुमच्या राशीत असल्याने आज मानसिक स्थैर्य आणि निर्णयक्षमतेत वाढ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे व्यवहार किंवा चर्चा शांतपणे हाताळता येऊ शकतात. नातेसंबंधात गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे.

वृषभ

आज कामाच्या ठिकाणी सातत्य ठेवले तर चांगले परिणाम दिसून येणार आहेत. आर्थिक बाबतीत सावध निर्णय घ्यावेत. पण दीर्घकालीन नियोजनासाठी दिवस अनुकूल आहे.

मिथुन

विशाखा नक्षत्राचा प्रभाव तुमच्या प्रयत्नांना दिशा देणारा ठरणार आहे. नवीन कामाची सुरुवात करण्याऐवजी सध्या सुरू असलेल्या कामांकडे लक्ष दिल्यास यश मिळेल.

कुंभ

आज विचारांमध्ये स्पष्टता येणार आहे. भविष्याबाबत योग्य निर्णय घेता येऊ शकणार आहेत. संयम ठेवल्यास दिवस समाधानकारक ठरेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: सिगारेट द्यायला नकार, तरुणाने पान टपरीवाल्याला जिवंत जाळलं; मुंबई हादरली

Cigarette Price Hike: एका सिगारेटसाठी मोजावे लागणार 72 रुपये? केंद्र सरकारचा मोठा निर्णय | VIDEO

Akola : अकोल्यात भाजप आणि MIMच्या युतीचा दुसरा अंक; एमआयएमच्या मतांवर भाजप नेत्याचा मुलगा स्वीकृत नगरसेवक

Maharashtra Live News Update : मकरसंक्रांतीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची तुळशी व पाद्यपुजा बंद राहणार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना फक्त शिंदेंमुळे, फडणवीस- अजितदादांनी श्रेय घेऊ नये; भरत गोगावले | VIDEO

SCROLL FOR NEXT