

घोरण्याची समस्या ही आपल्यापैकी अनेकांना त्रास देते. काहींना ही सवय वाटू लागते. मात्र या समस्येमुळे अनेकांच्या झोपेवरही परिणाम होतो. यामुळे अपुऱ्या झोपेमुळे थकवा, चिडचिड या तक्रारीही उद्भवतात. घोरणं हे स्लिप एप्नियासारख्या गंभीर समस्यांचं लक्षण असू शकतं. जर घोरण्याची कारणं आणि परिणाम समजून घेतले तर शांत झोप लागण्यास मदत होते.
सर्दी, एखाद्या प्रकारची एलर्जी किंवा सायनस यामुळे नाक बंद होण्याची समस्या निर्माण होते. अशावेळी नाकातील जागा कमी पडत असल्याने हवा फिरताना आवाज होतो.
पाठीवर झोपल्यामुळे आपली जीभ आणि मऊ टाळू काहीसा मागच्या बाजूनला सरकला जातो. यामुळे श्वसनमार्ग अरुंद होतो. त्यामुळे टिश्यूंमध्ये कंपन निर्माण होतात आणि घोरण्याचा आवाज होतो.
ज्या व्यक्तींना जास्त वजनाचा त्रास असतो त्यांना घोरण्याची समस्या अधिक सतावते. मानेभोवती जास्त प्रमाणात चरबी साठल्यास त्याचा श्वसनमार्गावर दाब येतो आणि तो अरुंद होतो. घशातील अतिरिक्त टिश्यूमधून हवा सरकत असल्याने आवाज होतो. त्याचप्राणे स्थूलतेमुळे स्लीप अॅप्नियाचा धोकाही वाढतो.
मद्यपान केल्यामुळे व्यक्तीच्या घश्यातील स्नायू काही प्रमाणात रिलॅक्स होतात. ज्यामुळे घोरण्याचा धोका वाढू शकतो. दारूच्या सेवनाने व्यक्तीला गाढ झोप लागते आणि घोरण्याचा आवाजही तीव्र येतो.
अपुरी झोप झाली असल्यास जेव्हा झोप लागते तेव्हा गाढ लागते. ज्यामुळे मसल्स रिलॅक्स होतात आणि घोरण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे व्यक्तीला थकवाही येतो.
अनेकदा घोरण्याच्या समस्येमध्ये तुमच्या जीवाला धोका नसतो. मात्र अतीप्रमाणातील घोरणं हे स्लिप एप्नियाचं लक्षणं असतं. ही लक्षणं दिसल्यास घोरणं गंभीर ठरू शकतं-
मोठ्याने आणि वारंवार घोरणं
रात्री गुदमरल्यासारखं किंवा श्वास अडकल्यासारखं वाटणं
दिवसा जास्त झोप येणं
सकाळी डोकेदुखी
लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं
उच्च रक्तदाब
हृदयाच्या समस्या
टाईप 2 डायबिटीज
स्ट्रोक
डिप्रेशन किंवा मानसिक समस्या
स्मरणशक्ती कमी होणं
लाईफस्टाईलमध्ये बदल केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो. यामध्ये वजन कमी करा, वेळेत झोपा किंवा झोपण्यापूर्वी मद्यपान करू नका.
नाकाची शस्त्रक्रिया किंवा टॉन्सिल काढणं यासारखे उपाय गंभीर घोरण्यासाठी केले जाऊ शकतात.
CPAP (Continuous Positive Airway Pressure) आणि Mandibular Advancement Devices या काही वैद्यकीय डिव्हाईसमुळे त्रास कमी होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.