Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Zodiac signs: आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! अमावस्येनिमित्त ‘या’ राशींचं बदलणार भाग्य

Lucky zodiac signs today's prediction: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक तिथीचे स्वतःचे महत्त्व असते, पण अमावस्या ही तिथी नवीन सुरुवात आणि बदल घडवून आणणारी मानली जाते.

Surabhi Jayashree Jagdish

आज 20 नोव्हेंबर 2025 आहे. हेमंत ऋतूने गारवा वाढवला असून धार्मिकदृष्ट्या आजचा दिवस विशेष मानला जातोय. याचं कारण म्हणजे आज अमावस्या तिथी आहे. ग्रहस्थितीनुसार आज काही राशींना विशेष अनुकूलता मिळणार आहे. दिवसातील शुभ-अशुभ वेळा लक्षात घेऊन कामांची आखणी केल्यास लाभ होईल.

आजचं पंचांग तपशील

  • तिथि: अमावस्या

  • नक्षत्र: विशाखा

  • करण: नाग

  • पक्ष: कृष्ण पक्ष

  • योग: शोभन (09:53:31 AM पर्यंत)

  • दिन: गुरुवार

  • सूर्योदय: 06:39:26 AM

  • सूर्यास्त: 05:26:08 PM

  • चंद्र उदय: 06:37:39 AM

  • चंद्रास्त: 05:14:17 PM

  • चंद्र राशी: वृश्चिक

  • ऋतु: हेमंत

  • शक संवत्: 1947

  • विक्रम संवत्: 2082

  • माह (अमान्ता): कार्तिक

  • माह (पुर्निमान्ता): मृगशिरा

अशुभ मुहूर्त

राहुकाल: 01:23:37 PM ते 02:44:27 PM

यमघंट काल: 06:39:26 AM ते 08:00:16 AM

गुलिकाल: 09:21:06 AM ते 10:41:56 AM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त: 11:41:00 AM ते 12:23:00 PM

आजचा दिवस या चार राशींसाठी ठरणार शुभ

वृश्चिक राशी

चंद्राने तुमच्या राशीत प्रवेश केल्यामुळे आज मानसिक स्थैर्य वाढणार आहे. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे. आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक बाबतीत आनंददायी वातावरण राहणार आहे.

मीन राशी

आज तुमच्यासाठी प्रगतीचा दिवस आहे. आजच्या दिवशी महत्त्वाची कामं यशस्वी होणार आहे. आर्थिक लाभ आणि मनःशांती दोन्ही मिळणार आहे. प्रवासासाठीही अनुकूल दिवस आहे.

कर्क राशी

घर-परिवारात समाधान वाढण्याची शक्यता आहे. आज घेतलेले निर्णय फायद्याचे ठरू शकणार आहेत. कामात प्रगती, नवी संधी आणि अनुकूलता मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या दिवस मजबूत राहणार आहे. अडलेली कामं पुढे सरकतील.

धनु राशी

आज उत्साह वाढेल, नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. आर्थिक लाभ, तसेच महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा फायदेशीर राहणार आहे. दुपारनंतर शुभ वार्ता मिळू शकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 9 वर्षांनंतर अचानक समोर आला बॉयफ्रेंड आणि....! लॉन्ग डिस्टन्स कपलचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Tilgul Ladoo: तिळगुळ लाडू मऊ होण्यासाठी वापरा 'या' ३ सोप्या ट्रिक्स; ही आहे सोपी रेसिपी

Pune : प्रशांत जगतापांचे गुंड टिपू पठाणशी "घनिष्ट" संबंध? जामिनावर बाहेर आलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून आरोप

Maharashtra Live News Update : पुण्यात अजित पवारांचा भव्य रोड शो

PF Withdrawal: कामाची बातमी! या UPI App मधून काढता येणार PF चे पैसे, वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT