आज कार्तिक महिन्याची शुक्ल तृतीया तिथी आहे. दिवाळीचा उत्सव नुकताच संपला असून वातावरणात अजूनही आनंद आहे. आजचा दिवस साधेपणा आणि आत्मचिंतनासाठी योग्य आहे. धार्मिक दृष्ट्या कार्तिक महिना अत्यंत पुण्यदायी मानला जातो आणि या काळात देवपूजा, दानधर्म आणि पवित्र कार्यांना विशेष महत्त्व दिलं जातं.
अनुराधा नक्षत्र आणि सौभाग्य योग असल्यामुळे काहींसाठी हा दिवस आर्थिक किंवा व्यावसायिक दृष्ट्या शुभ परिणाम देऊ शकणार आहे. शुक्रवारचा दिवस असल्याने स्त्रिया आणि कला क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना लाभदायक काळ आहे. आज मानसिक शांती आणि कौटुंबिक सौख्य मिळणार आहे.
तिथी: शुक्ल तृतीया
नक्षत्र: अनुराधा
करण: तैतिल
पक्ष: शुक्ल पक्ष
योग: सौभाग्य (५:५५:२० AM, २५ ऑक्टोबरपर्यंत)
वार: शुक्रवार
सूर्योदय: ०६:२१:१३ AM
सूर्यास्त: ०५:४१:२३ PM
चंद्रोदय: ०८:४३:३३ AM
चंद्रास्त: ०७:१५:१० PM
चंद्र राशी: वृश्चिक
ऋतु: शरद
शक संवत: १९४७
विक्रम संवत: २०८२
माह (अमान्ता/पूर्णिमांत): कार्तिक
राहुकाल: १०:३६:१७ AM ते १२:०१:१८ PM
यमघंट काल: ०२:५१:२० PM ते ०४:१६:२१ PM
गुलिक काल: ०७:४६:१५ AM ते ०९:११:१६ AM
अभिजीत मुहूर्त: ११:३९:०० AM ते १२:२३:०० PM
नवीन कार्य किंवा व्यवहारासाठी: दुपारनंतरचा काळ अनुकूल
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. यावेळी तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आयुष्यात नवीन संधी मिळणार आहे.
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कामात प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या मित्रांकडून तुम्हाला कामात मोठी मदत होणार आहे.
नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे. समाजात मान-सन्मान वाढणार आहे आणि मित्रांकडून मदत मिळेल.
धार्मिक आणि आध्यात्मिक कामात मन गुंतून राहील. आजच्या दिवशी लक्ष्मीप्राप्तीचा योग आहे. आरोग्याच्या दृष्टीने दिवस समाधानकारक असणार आहे. कुटुंबात आनंदाचे क्षण येणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.