

पंचांग
शनिवार,२५ ऑक्टोबर २०२५,कार्तिक शुक्लपक्ष,विनायकी चतुर्थी.
तिथी- चतुर्थी २७|४९
नक्षत्र-अनुराधा
रास-वृश्चिक
योग-शोभन
करण-वणिज
दिनविशेष-ज्येष्ठा वर्ज्य
मेष - पैशाची आवका जावक म्हणण्यापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढते राहील. तब्येतीच्या तक्रारी, वाहनांपासून सावधगिरी बाळगावी लागेल. कोणाच्या सहकार्याची अपेक्षा न करता पुढे जावे लागेल.
वृषभ - वैवाहिक जीवन खूप छान असेल.सुसंवाद साधला जाईल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. कोर्टाच्या कामात सुद्धा यश मिळेल. दिवस चांगला आहे.
मिथुन - खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे. मात्र त्याचबरोबर आपल्या वस्तू गहाळ होणार नाहीत ना याची काळजी घ्यावी. नोकरी व्यवसायामध्ये दगदग झाली तरी सुद्धा यश मिळेल.
कर्क - कामाच्या ठिकाणी अंदाज अचूक ठरतील. प्रवासाचे योग आहेत . उपासनेच्या मार्गांमधून पुढे जाल. शिव उपासना करावी. नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी पुढाकार घ्याल.
सिंह - राहत्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लागतील. मन प्रसन्न आणि शांत वाटेल. कुटुंबीयांच्या सहकार्याने चांगल्या काही घटना घडतील.
कन्या - एकूणच तुमच्या कर्तुत्वाला चांगला आयाम मिळणार आहे. जिद्द आणि चिकाटीने पुढे जाणार आहात. सहज सोप्या गोष्टी घडताना काही जबाबदाऱ्याही अंगावर येतील.
तूळ - जुनी उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक सौख्याला दिवस चांगला आहे. धनलाभ होतील. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.
वृश्चिक - दैनंदिन कामामध्ये चांगल्या प्रकारे गती येईल. अडकलेली कामे मार्गी लागतील. तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर आज कमी होण्याच्या संभव आहे.
धनु - महत्वाची कामे शक्यतो उद्याच केलेली बरे. कारण ती रखडण्याची शक्यता आहे. विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणी बघून मनोबल कमी राहील. काळजी घ्यावी.
मकर - अनेकांच्या सहकार्याने पुढे जाण्याचे योग आहेत. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील आणि कामे मार्गी लागतील. धन लाभाला दिवस चांगला आहे.
कुंभ - एकूणच आपल्याला राशीला आजचा दिवस छान आहे. मनोबल आणि आत्मविश्वास यांत वाढ होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव होईल. समाजकारण राजकारणामध्ये घोडदौड होईल.
मीन - हाती घेतलेले काम नेटाने होईल. कामांमध्ये सुयश मिळेल. मानसिक स्वास्थ आणि समाधान यांनी भरलेला आजचा दिवस आहे. दत्तगुरूंची उपासना करावी. सदगुरु भेटतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.