Zodiac signs spiritual and professional success saam tv
राशिभविष्य

Lucky Zodiac Sign: आजचा दिवस धार्मिक कार्यांसाठी उत्तम; या चार राशींना मिळणार यश आणि सन्मान

Zodiac signs spiritual and professional success: हिंदू पंचांगानुसार आजचा दिवस अनेक शुभ योगांमुळे धार्मिक कार्ये आणि अध्यात्मिक उपक्रमांसाठी अत्यंत शुभ मानला जात आहे. आजच्या दिवसाचं पंचांग कसं आहे याची माहिती घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. या दिवशी मृगशिरा महिन्याचा प्रभाव जाणवणार आहे. यावेळी सूर्य शरद ऋतूच्या सौम्य प्रकाशात उगवणार आहे. चंद्र सिंह राशीत भ्रमण करत असल्याने आत्मविश्वास, धैर्य आणि नेतृत्वगुण यांचा प्रभाव राहणार आहे

ज्योतिष्य शास्त्रानुसार, आजचा दिवस धार्मिक कर्म, वाचन, तसंच सामाजिक कार्यासाठी शुभ मानला जातोय. आत्मचिंतन आणि सकारात्मक विचार करण्यासाठीही हा दिवस अनुकूल आहे.

आजचं पंचांग तपशील

  • तिथि: कृष्ण नवमी

  • नक्षत्र: मघा

  • करण: तैतिल

  • पक्ष: कृष्ण पक्ष

  • योग: इंद्र (१४ नोव्हेंबर, सकाळी ०६:२७:२९ पर्यंत)

  • वार: गुरुवार

  • सूर्योदय: 06:34:18 AM

  • सूर्यास्त: 05:28:30 PM

  • चंद्र उदय: 12:21:28 AM

  • चंद्रास्त: 01:34:12 PM

  • चंद्र राशी: सिंह

  • ऋतु: शरद

  • शक संवत्: 1947

  • विक्रम संवत्: 2082

  • माह (अमान्ता): कार्तिक

  • माह (पुर्निमान्ता): मृगशिरा

अशुभ काल

  • राहुकाल: 01:23:11 PM ते 02:44:57 PM

  • यमघंट काल: 06:34:18 AM ते 07:56:05 AM

  • गुलिकाल: 09:17:52 AM ते 10:39:38 AM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त: 11:40:00 AM ते 12:22:00 PM

कोणत्या राशींसाठी आजचा दिवश ठरणार लकी

सिंह राशी

चंद्र तुमच्या राशीत असल्याने आजचा दिवश तुमच्यासाठी विशेष शुभ ठरणार आहे. आजच्या दिवशी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. यावेळी तुम्हाला कामात यश मिळणार आहे. त्याचप्रमाणे कुटुंबात आदर आणि सन्मान वाढणार आहे.

धनु राशी

आजच्या दिवशी नवीन संधी तुमच्याकडे येऊ शकणार आहेत. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. मित्रपरिवारातून आनंददायी बातमी मिळू शकते.

मेष राशी

आज तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर दिवस ठरू शकणार आहे. जुने व्यवहार संपुष्टात येणार आहेत. यावेळी तुमचं आरोग्य चांगले राहणार आहे.

कन्या राशी

कामातील नियोजन यशस्वी होणार आहे. घरातील वातावरण सौहार्दपूर्ण राहण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी दुपारनंतर तुम्हाला चांगली बातमी मिळण्याचे संकेत आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash Mystery: दादांच्या अपघातावरून पुन्हा 'संशयकल्लोळ', अपघातापूर्वी बारामती विमानातळाची रेकी

एकनाथ शिंदे मोठा डाव टाकणार; कोणाच्या गळ्यात घालणार राज्यसभेची माळ? शेवटच्या क्षणापर्यंत संस्पेन्स

T20 WC 2026: टॉपर दक्षिण आफ्रिका पुन्हा 'चोकर्स'; न्यूझीलंडने दिमाखात गाठली फायनल, पाच पराभवांचा घेतला बदला

युद्धाचा भडका, शेतकऱ्यांना फटका; आखाती देशांमध्ये निर्यात महागली, VIDEO

ट्रम्पच्या विरोधात अमेरिकी जनता रस्त्यावर, ट्रम्प गुन्हेगार, अमेरिकेत झळकले बॅनर

SCROLL FOR NEXT