Astrological effects of Trikadasha Yog Saam Tv
राशिभविष्य

Trikadasha Yog: आज 18 वर्षांनंतर बुध-यम बनवणार त्रिएकादश योग; करियरमध्ये होणार चांगली प्रगती, पैसाही मिळणार

Astrological effects of Trikadasha Yog: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आणि त्यांच्या स्थितीमुळे तयार होणारे योग मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध (Mercury) आणि यम यांची विशिष्ट स्थिती आज १८ वर्षांनंतर होतेय.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, व्यापार, तर्कशक्ती, शिक्षण आणि बौद्धिक क्षमतेचा कारक मानला जातो. बुध ग्रह साधारणतः एका राशीत सुमारे १५ दिवस राहतो. परिणामी बुध ग्रह एका महिन्यात दोन वेळा गोचर करतो. बुध ग्रहाच्या या बदलामुळे अनेक शुभ योग देखील तयार होतात.

सध्या बुध वृश्चिक राशीत आहे, जिथे मंगळ देखील विराजमान आहे. बुध या स्थितीतून शनीच्या मकर राशीत असलेल्या यम ग्रहाशी लाभदृष्टि निर्माण करणार आहे. या संयोगाला त्रिएकादश योग असं म्हणतात. या विशेष योगाचा सर्व १२ राशींवर परिणाम होणार असला तरी तीन राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी बुध आणि यम एकमेकांपासून ६० अंशांवर असतील. या वेळी तुला, कुंभ आणि मेष राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे.

मेष राशी

मेष राशीच्या व्यक्तींसाठी बुध-यमचा त्रिएकादश योग अनेक अर्थांनी लाभदायक ठरू शकणार आहे. या राशीत बुध आठव्या भावात आणि यम दहाव्या भावात विराजमान आहेत. त्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा मिळू शकणार आहे.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी बुध-यमचा केंद्र दृष्टि योग अत्यंत अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात पद-प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात स्पर्धकांना मागे टाकून तुम्ही स्वतःचं स्थान निर्माण करू शकता. व्यवसायात मोठा नफा मिळू शकणार आहात. अचानक धनलाभाचे योग तयार होणार आहे.

तूळ राशी

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी ही वेळ खूपच फलदायी ठरू शकणार आहे. बुध दुसऱ्या भावात विराजमान असल्यामुळे वाकपटुतेच्या जोरावर यश मिळू शकणार आहे. शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात विशेष लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ फायदेशीर ठरू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भरधाव कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली; एकाच कुंटुबातील ४ जणांचा मृत्यू

Police Officer Transfer: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ३४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

SRPF भरती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; पेपर फुटीचा मुख्य आरोपी आला समोर

Accident: पालघरमध्ये अपघाताचा थरार, २ दुचाकींची समोरासमोर धडक; २ जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर

Bribe Case: मुंबईतील ज्युनियर कॉलेजच्या मंजुरीसाठी मागितली दीड लाखांची लाच; लिपिकाला ठोकल्या बेड्या, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT