Horoscope saam tv
राशिभविष्य

Thursday Horoscope : साधेपणाने वागणे टाळा, अन्यथा...; ५ राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Thursday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना साधेपणाने वागणे टाळणे गरजेचे आहे. तर ५ राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे.

Anjali Potdar

आजचे पंचांग

गुरुवार,२२ मे २०२५,वैशाख कृष्णपक्ष.

तिथी-दशमी २५|१३

रास-कुंभ १२|०८ नं.मीन

नक्षत्र-पूर्वाभाद्रपदा

योग-विष्कंभ

करण-वणिज

दिनविशेष-१४ प.चांगला

मेष - ओळखी करण्यासाठी आपली रास नेहमी पुढाकार घेते. आज नव्याने परिचय होतील. जुन्या संबंधातून, गुंतवणुकी मधून लाभ होईल. पत्रव्यवहार मार्गी लागतील.

वृषभ -सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे जाल. राजकारणामध्ये यश आहे. कामामध्ये आघाडीवर राहाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनासारख्या घटना घडतील. अजून काय हवंय! दिवस चांगला आहे.

मिथुन - विष्णू उपासना फलदायी ठरेल. मनामध्ये असणाऱ्या गोष्टी पूर्ण होतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल, जी तुम्हाला आनंदाच्या शिखरावर घेऊन जाईल.

कर्क - खर्चाचे प्रमाण वाढते राहील. हातात नसणारी आपली गोष्ट म्हणजे आरोग्य. याच्या तक्रारी जाणवतील. मानसिकता चांगली ठेवून दिवसाला सामोरे जावे लागेल.

सिंह - आपली मते काय आपला उद्देश काय? आपले निर्णय काय? याचा खोलवर विचार कराल. याविषयी आग्रही राहाल आणि यामध्ये जोडीदाराची अपेक्षित साथ मिळाल्यामुळे समाधान लाभेल.

कन्या - सातत्याने दोलायमान मानसिकता आज टाळावी लागेल. हितशत्रूंवर मात कराल. काही जणांचा वाचनाकडे कल राहील. तब्येत मात्र सांभाळावी लागेल.

सिंह - बौद्धिक क्षेत्रात प्रगती होणार आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस कराल. मनोरंजन आणि कलाक्षेत्रामध्ये आघाडीवर राहाल. दिवस सुखच सुख घेऊन आलेला आहे.

वृश्चिक - आरोग्य चांगले राहील. दैनंदिन कार्य मार्गी लागतील. घर खरेदी, प्लॉट खरेदी, क्रयविक्रय होईल. दिवस चांगला आहे.

धनु - व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येईल. जिद्द आणि चिकाटीने या सर्व गोष्टी पार पाडाल. मोठ्या भावंडाचे सहकार्य लाभेल.

मकर - व्यवसायामध्ये नवीन तंत्र मंत्र अवलंबून आणू शकाल. पैशाची निगडीत तजबीज करावी लागेल. धनची आवक चांगली राहील. कौटुंबिक जीवनामध्ये स्वास्थ मिळेल.

कुंभ - आयुष्य कशासाठी आहे? याचा आपण विचार नेहमीच करता. आज मात्र या विचारातून नव्या दिशा, नवा मार्ग सापडेल. आपली बौद्धिक रास आहे. बुद्धी विषयक काम कराल. एकूणच उत्साह, उमेद वाढेल.

मीन - एखादा दिवस अडचणीत उद्भव करणार असतो. शासकीय कामे रखडण्याची शक्यता आहे. साधेपणाने वागणे टाळा. अध्यात्माकडे कल ठेवलात तर निर्णय चुकणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार

Horoscope benefits: आजच्या दिवशी कुणाला मिळणार लाभ? पाहा २९ डिसेंबरचं पंचांग आणि राशीभविष्य

Pune Politics: पुण्यात काँग्रेस-शिवसेना अन् मनसे एकत्र निवडणूक लढवणार, जागा वाटपाचा तिढा सुटला; आज होणार घोषणा

Januray 2026 Gochar: जानेवारीत मकरसह ३ राशी होणार मालामाल; 4 ग्रह करणार त्यांच्या राशीत बदल

Success Story: सलग १० वेळा नापास, आईचे दागिने गहाण ठेवले; जिद्दीने क्रॅक केली UPSC; सिद्धार्थ सक्सेना यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT