Weekly Horoscope saam tv
राशिभविष्य

Weekly Horoscope 'या' राशींची पैशाची चिंता मिटून व्यवसायातून चांगला नफा मिळेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Money gains this week astrology: ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर आणि नक्षत्रांची स्थिती प्रत्येक आठवड्यात बदलत असते, ज्यामुळे प्रत्येक राशीच्या जीवनात मोठे बदल होतात. येणारा आठवडा काही राशींसाठी आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत शुभ ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मेष

व्यवसायात सतर्क राहून कामे करा. पैशाच्या व्यवहारात चोखंदळ राहा. अतिविश्वास बाळगू नका. नोकरीत महत्त्वाच्या निर्णयात वरिष्ठांचा सल्ला घ्या. छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वाद‌विवाद होण्याची शक्यता आहे.

वृषभ

वेळेचे व कामाचे योग्य नियोजन केलेत तर रेंगाळलेली कामे मार्गी लागतील, ओळखीतून नवीन कामे मिळतील, व्यवसायात आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी कार्यपद्धतीत बदल कराल. सरकारी नियमांचे उल्लंघन न करता कामात फायदा वाढवाल, कमी श्रमात जास्त यश मिळवाल. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील.

मिथुन

पैशाचे गणित मांडून कामे स्वीकारा, अंथरूण पाहून पाय पसरा व्यवसायात नवे तंत्रज्ञान वापरून कामात उलाढाल वाढवाल. नवीन कामांसाठी खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. या कामी बँका व हितचिंतकांची मदत होईल. नोकरीत बदल करण्याचा विचार मनात येईल, परंतु थोडा धीर धरा. घरात अनावश्यक खर्च वाढेल.

कर्क

भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कृती करा. व्यवसायातील अडथळे कमी झाल्याने जिद्दीने कामाला लागाल, डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून त्याप्रमाणे वेळेचे गणित मांडा. पैशाची वसुली मनाप्रमाणे होईल. नोकरीत वरिष्ठ दिलेला शब्द पाळतील व आश्वासने पूर्ण करतील. जोडधंद्यातून विशेष लाभ संभावतो. घरात एखादा छोटासा समारंभ पार पडेल.

सिंह

एखादे काम हाती घेतले की ते ताबडतोब झाले पाहिजे, असा तुमचा हट्ट असतो, पण त्यामुळे चुका होण्याची दाट शक्यता असते. व्यवसायात धोके पत्करून नवीन कामे स्वीकारावी लागतील. नवीन कामे मिळवताना त्त्यात ओळखीचा हात मोठा असेल. त्यातील संभाव्य धोके व त्रुटींचा अभ्यास करून मगच पुढे जा. नोकरीत विनाकारण कामे लांबवू नका.

कन्या

पुढाकार घेऊन कामाचा उरक वाढवाल, त्यासाठी वेळप्रसंगी थोडा धोकाही पत्कराल. व्यवसायात ठोस व ठाम कृतीवर भर राहील. फायदा मिळवून देणारे काम प्राधान्याने हाती घ्याल. तडजोड व तत्त्वांशी मूरड घालून कामे पूर्ण करण्यावर भर राहील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत नशीब साथ देईल, जोडधंद्यातून विशेष कमाई करता येईल.

तूळ

या सप्ताहात एखाद्या कारणावरून तुमचा सात्त्विक संताप उफाळून येईल. व्यवसायात चुकीच्या व्यक्तीशी हातमिळवणी करू नका. महत्त्वाचे निर्णय घेताना तज्ज्ञांचा, ज्येष्ठांचा सल्ला घ्या. नवीन करार करण्यापूर्वी नीट विचार करा. नोकरीत हलके कान ठेवलेत तर त्रास होईल. सहकाऱ्यांवर विसंबून राहू नका, हातातील कामे वेळेत संपवा.

वृश्चिक

मनोकामना व ईप्सित साध्य करणारे ग्रहमान आहे. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे हाती घ्याल. कमी श्रमात जास्त यश मिळेल नोकरीत नवीन संधीसाठी तुमची निवड होईल. जोडधंद्यातून विशेष कमाई करता येईल. जुनी कामे मार्गी लागतील. वरिष्ठांची मर्जी राहील. घरात शुभकार्ये ठरतील, केलेल्या श्रमाचे चीज होईल.

धनू

प्रगतीसाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब कराल. कामामुळे थोडा तणाव जाणवेल. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी चाकोरीबाहेर जाऊन मार्गाचा अवलंब कराल. कामाचे प्रमाण मनाजोगते राहील. त्यामुळे समाधान मिळेल. नोकरीत वरिष्ठ नवे आव्हान तुमच्यापुढे ठेवतील. घरात खर्चिक बेत ठरतील. तरुणांनी वायफळ व अयोग्य संगत टाळावी.

मकर

यशाच्या वाटा हजार, याचा प्रत्यय येईल. व्यवसायात मिळालेल्या संधीचा जास्तीतजास्त लाभ घेऊन कामात यश मिळवाल. पैशाची चणचण दूर करण्यासाठी तात्पुरती कर्जे किंवा हितचिंतकांची मदत घ्यावी लागेल, नोकरीत जास्त कामासाठी वरिष्ठ तुमची तोंडदेखली स्तुती करतील, पण सावध राहा. पैशाच्या मोहापायी कुसंगत धरू नका.

कुंभ

सभोवतालच्या परिस्थितीनुरूप तुम्ही तुमचे धोरण लवचिक ठेवा. व्यवसायात नवीन कामे स्वीकारताना केवळ पैशावर लक्ष ठेवू नका. त्यातील तांत्रिक अडचणी व वेळ याचाही विचार करा. नवीन कामे मिळतील. नोकरीत कोणाचीही चूक न काढता आपले काम वेळेत संपवा. वरिष्ठांचा मूड बघून मागण्या मांडा.

मीन

मनाजोगते काम झाल्याने हायसे वाटेल. स्वच्छंदी जीवन जगण्याचा मोह होईल. व्यवसायात कामाचा व्याप जास्त असेल. पण योग्य व्यक्तींकडून मदतीचे आश्वासन मिळेल. पैशाची तजवीज होईल. नवीन हितसंबंध निर्माण होतील. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. संसारिक जीवनात सहजीवनाचा आस्वाद घेता येईल. कुटुंबासमवेत छोटी सहल काढाल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

Crime News: नवऱ्याला चारित्र्याचा संशय; वाट अडवून भररस्त्यात बायकोसोबत केलं भयानक कृत्य

Nilesh Ghaywal illegal property : घायवळच्या घरावर पोलिसांची धाड, कोण आहे घायवळचा आका? VIDEO

'आनंदाचा शिधा' बंद होणार? लाडकी बहिण योजनेचा फटका

Two Group Clash : भाजप मंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान मोठा राडा; कार्यकर्ते आपापसात भिडले, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT