'आनंदाचा शिधा' बंद होणार? लाडकी बहिण योजनेचा फटका

Anandacha Shidha Scheme: शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे लाडकी बहिण योजनेचा भार पेलवला जात नाही. अशा स्थितीत लाडकीचा फटका इतर लोकप्रिय योजनांनाही बसतो आहे. कोणती योजना बंद पडणार आहे.
Chhagan Bhujbal statement on Anandacha Shidha
Chhagan Bhujbal statement on Anandacha ShidhaSaam Tv
Published On

मोठा गाजावाजा करुन सुरु केलेल्या अनेक योजनांना आता घरघर लागली आहे. लाडकी बहिण योजनेमुळे विकास कामेच ठप्प झाल्याची ओरड असतानाच आता गरीबांसाठी सुरु केलेली आनंदाचा शिधा ही योजना बंद होणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी यासंदर्भातले संकेत दिलेत. लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांना फटका बसत असल्याचं त्यांनी कबुल केलंय. तर यावरुन विरोधकांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये दिवाळीसाठी ही योजना सुरू केली होती. सणासुदीच्या काळात केशरी रेशनकार्ड धारकांना स्वस्त दरात अन्नधान्य किट उपलब्ध करून दिलं जात होतं. दिवाळी, गुढीपाडवा, गणेशोत्सव अशा सणासुदीच्या काळात 100 रुपयात अन्नधान्य उपलब्ध करून दिलं जायचं. यामध्ये एक किलो रवा, साखर, चणा डाळ आणि खाद्यतेल अशा वस्तूंचा समावेश होता. मात्र यावेळच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही.

ही योजना सुरु झाल्यानंतर एक कोटी 72 लाख शिधापत्रिकाधारकांनी योजनेचा लाभ घेतला होता. मात्र, महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर या योजनेच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज, तीर्थाटन अशा अनेक योजना अडचणीत आल्यात...तिजोरीत खडखडाट असल्यानं लोकप्रिय योजना राबवताना सरकारची कसरत होतेय हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालंय. एकूणच पैशांचं सोंग आणता येत नाही हेच खरं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com