Guru-Budh Yuti 2024 saam Tv
राशिभविष्य

Budh Shukra Yuti 2024: दिवाळीपूर्वीच 'या' राशींना मिळणार बोनस; शुक्र-बुधाची युती करणार मालामाल

Budh Shukra Yuti 2024: दिवाळीपूर्वी 29 ऑक्टोबर 2024 रोजी बुध मंगळाच्या वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी वृश्चिक राशीत शुक्र आणि बुध यांचा संयोग काही राशींसाठी लाभदायक ठरू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी हिंदू धर्मासाठी दिवाळी ही फार महत्त्वाची मानली मानली. यावेळी 29 ऑक्टोबर 2024 रोजी बुध मंगळाच्या वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. ज्या ठिकाणी शुक्र आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत बुध आणि शुक्राची युती होणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी वृश्चिक राशीत शुक्र आणि बुध यांचा संयोग काही राशींसाठी लाभदायक ठरू शकतो. या काळात या राशी भरपूर कमाई करू शकणार आहेत. तर कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला लाभ देखील मिळणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ मिळणार आहे.

मेष रास

बुध ग्रहाच्या गोचरमुळे तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. उत्पन्नाचे नवीन साधन मिळू शकणार आहे. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ आणि व्यवसायात नवीन संधी मिळणार आहे. हा काळ तुमच्यासाठी भाग्यवान ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळू शकणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधाचं गोचर फायदेशीर ठरणार आहे. ज्यांचा बिझनेस आहे त्यांच्यासाठी हे गोचर उत्तम ठरणार आहे. या काळात तुमची प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळणार आहेत. कुटुंबाकडून सहकार्य मिळणार आहे.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी हे गोचर शुभ ठरणार आहे. शोधात असलेल्या लोकांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा पगार वाढू शकणार आहे. विद्यार्थ्यांसाठी काळ शुभ असणार आहे. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी काळ चांगला राहणार आहे. नोकरीच्या ठिकाणच्या अडचणी दूर होणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील शिरलस शेतशिवारात बिबट्याचा वावर

Velachiche Pani: १ ग्लास वेलचीचे पाणी ठरेल 'अमृत', १५ दिवसांत शरीरात दिसेल बदल

Monsoon health tips: पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? आहारात व्हिटॅमिन C असलेले पदार्थ ठेवा!

Fried Modak Recipe: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायासाठी बनवा खुसखुशीत स्वादिष्ट तळणीचे मोदक; वाचा सोपी रेसिपी

Mysterious Fort : सोनं-चांदीने भरलेल्या विहिरी! 'या' किल्ल्यातील गुप्त खजिन्याचं रहस्य आजही कायम

SCROLL FOR NEXT