Shani 2025 AI
राशिभविष्य

Shani Dev: शनीदेवाच्या या आहेत सर्वात प्रिय राशी; पाहा कसा मिळेल येत्या काळात लाभ

Shani Dev Favourite Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रानुसार शनीदेव हा न्यायाचा देव मानला जातो. मेहनत, शिस्त आणि संयम यांना शनीदेव नेहमीच फळ देतात. काही राशींवर शनीदेवाची विशेष कृपा असते आणि त्या राशींना येणाऱ्या काळात मोठा लाभ मिळतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला क्रूर मानण्यात येतं. मात्र न्यायाचे देवता शनी हे कर्मंचे फळ देणारे आहेत. ते लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. अशा परिस्थितीत, शनिदेव एखाद्या व्यक्तीला रंकापासून राजा बनवू शकतात. बहुतेक लोक शनीची साडेसात किंवा धैया हे नाव ऐकून घाबरतात.

शनी देवाचा नेहमीच नकारात्मक परिणाम होतो असं नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशी आहेत ज्यांच्यावर शनिदेवाचा विशेष आशीर्वाद असतो. या राशीच्या लोकांवर शनिदेवाचा नकारात्मक प्रभाव खूप कमी असतो . शनीदेवाच्या प्रिय राशी कोणत्या आहेत ते पाहूयत.

मकर रास

मकर ही शनीची राशी असून या राशीखाली जन्मलेले लोक शिस्तप्रिय, मेहनती, जबाबदार असतात. शनि नेहमीच त्यांच्यावर दयाळू असतो. जर शनीची साडेसातीची रास या राशीत आली तर त्यांना मानसिक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. मात्र शनीदेव त्यांना कोणताही त्रास होऊ देत नाहीत.

कुंभ रास

ज्योतिषशास्त्रामध्ये कुंभ राशीला शनीचं मूळ त्रिकुट मानलं जातं. या राशीखाली जन्मलेले लोक खूप दानशूर, सौम्य असतात. ते खूप प्रामाणिक असतात. या राशीखाली जन्मलेल्या लोकांना शनिदेवाचा विशेष आशीर्वाद असतो. येत्या काळात या आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा आहे.

तूळ रास

तूळ राशीत शनी उच्चस्थानी आहे. या राशीखाली जन्मलेल्या व्यक्तींवर शनी खूप प्रसन्न असतात. साडेसती किंवा धैय्या दरम्यान तूळ राशीच्या लोकांना अचानक त्यांच्या कारकिर्दीत उच्च पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rinku Rajguru Photos : दिसतीया भारी, नेसुनी साडी, काळजाचं पाणी पाणी करतीया पोर ही...

Maharashtra Live News Update: कृष्णराज महाडिक कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार

Mangesh Kalokhe : खोपोलीतील माजी नगरसेवकच्या हत्याकांडातील ९ आरोपी गजाआड; दोघे फरार

Sanjay Raut : शरद पवारांचा पक्ष फोडण्यात अदानींच्या भावाचा हात, राऊतांच्या दाव्याने देशात खळबळ

Eyelash Care: भुवयांचा रंग फिकट दिवसेंदिवस फिकट दिसतोय? या सोप्या टीप्सने भुवया दिसतील एकदम ठळक

SCROLL FOR NEXT